Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" हि लढाई अजून संपलेली नाही , मी अजून जिंकलेलो नाही "...

” हि लढाई अजून संपलेली नाही , मी अजून जिंकलेलो नाही ” – सुधाकर भाऊ घारे..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )भाऊ , तुम्ही हरला नाहीत , तर जनतेच्या मनातील खरे ” आमदार ” आहात . सर्व जनतेने , अधिकारी वर्गाने , आदिवासी बांधवांनी , महिला भगिनींनी तुम्हाला या मतदार संघाचा ” आधार ” म्हणून स्वीकारलं आहे , अश्या भावनाविवश प्रतिक्रिया आज बुधवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ रोजी कर्जतमध्ये रॉयल गार्डनच्या भव्य सभागृहात आयोजीत केलेल्या ” नव संकल्प सभेत ” आपले नेते परिवर्तन आघाडीचे उमेदवार ” सुधाकर भाऊ घारे ” यांच्या झालेल्या ” आकस्मित ” पराभव निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अनेक पदाधिकारी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या . यावेळी रॉयल गार्डन सभागृह कार्यकर्त्यांनी खचाखच भरला होता . निवडणुकीचा निकाल लागल्यावर प्रथमच सामोरे जाताना सुधाकर भाऊ घारे यांच्या समर्थनात मतदार संघातील अनेक कार्यकर्ते उपस्थित राहिले होते . हा पराभव अनेकांना ” चटका ” लावून गेला .

यावेळी व्यासपीठावर परिवर्तन आघाडीचे उमेदवार सुधाकर भाऊ घारे , अशोक शेठ भोपतराव , भरत भाई भगत , भगवान शेठ भोईर ,भगवान शेठ चंचे , एकनाथ दादा धुळे , संकेत साखरे , संतोष बैलमारे , विलास थोरवे , उत्तम भाई जाधव , निगुडकर , रंजना धुळे , सुरेखा खेडकर , अशोक सावंत , मधुकर भाऊ घारे , कुमार दिसले , दिपक श्रीखंडे , सुनील गायकवाड , त्याचप्रमाणे अनेक मान्यवर , महिला वर्ग उपस्थित होते .

यावेळी उपस्थित जनसमुदायास संबोधित करताना सुधाकर भाऊ घारे म्हणाले की , ” ही लढाई अजून संपलेली नाही , मी अजून जिंकलेलो नाही ” . या निवडणुकीत आपण अपक्ष लढलो आपण सर्व माझ्या बरोबर होते , अपक्ष असून सुद्धा आपण इतकी मते घेतली , हे ही काही कमी नाही . या मतदार संघात २०१४ साली झालेल्या निवडणुकीत आम्ही मदत केली नसती तर तुमचा ” करेक्ट कार्यक्रम ” झाला असता , मग आम्ही कोणीच नव्हतो तर का आला आमच्याकडे मदत मागायला ? असा संतप्त पलटवार माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्यावर करत त्यांचा पुतण्या आता पोपट झाला आहे , तो म्हणतो मधुकर भाऊ यांना डावलून सुधाकरला उमेदवारी दिली , पण ही ताकद आम्ही स्वतः तयार केली आहे , मी कुणाला दोष देणार नाही , पण माझा घात करणाऱ्यांना धडा शिकवणार , सर्व निवडणुकीत माझ्या पेक्षा जास्त तुम्हाला ताकद देईन , पण यांचा कार्यक्रम करेक्ट करणार , असा इशारा त्यांनी त्यांना पराभूत करणाऱ्या ” पडद्या मागच्या ” सर्व विरोधकांना दिला .

येथील जनतेने यांना निवडून दिले , तर हे ” दंड थोपटून ” पुन्हा एकदा तुम्हाला त्रास द्यायला निवडून आलो असल्याचे दाखवत आहेत , यावर प्रकाश टाकत आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यावर टिका केली . मला मत द्या अथवा ज्यांनी पण नाही दिले अशा सर्वांच्याच पाठीशी मी ठाम उभा आहे , मला कुणा मतदाराला दोष द्यायचा नाही , पण कुठल्या कार्यकर्त्याला त्रास दिला तर मी ठाम विरोधात उभा राहणार , बघुन घेईन , पुरून उरेल , या धमक्यांना न घाबरता खचून जाऊ नका , असे आवाहन त्यांनी सर्वांना केले . आदिवासी बांधवांनी खूप मदत केली , माझ्यावर त्यांचे खूप उपकार आहेत , त्यांना मी कधीच विसरणार नाही , मी त्यांच्या सोबत राहीन , अडचणी येतील , पण आपण एकत्र काम करू , असा विश्वास त्यांनी सर्वांना दिला . हा निकाल अनपेक्षित आहे , मात्र आम्ही पराभव मान्य केला आहे , म्हणूनच कुणी खचून न जाता पुढील सर्व निवडणुका आपण ताकदीने लढू , हे सांगत सुधाकर भाऊ घारे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे , मतदारांचे आभार व्यक्त केले . त्यांच्या प्रतिक्रियेने संपूर्ण सभागृह ” भावनाविवश ” झाला असल्याचे चित्र येथे पहाण्यास मिळाले . यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी सुधाकर भाऊ घारे यांची भेट घेऊन , आम्ही तुमच्या सोबतच आहोत , असा विश्वास व ताकद दिली .
- Advertisment -

You cannot copy content of this page