Tuesday, May 30, 2023
Homeपुणेलोणावळाहुडको कॉलनीत चोरट्याचा धुमाकूळ, स्थानिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव उधळला…

हुडको कॉलनीत चोरट्याचा धुमाकूळ, स्थानिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव उधळला…

लोणावळा (प्रतिनिधी) : अज्ञात चोरट्यांकडून लोणावळा सह्याद्री नगर हुडको कॉलनी येथे सोमवारी रात्री 2.15 ते 2.30 च्या दरम्यान धुडगूस घालत एका घरात चोरीचा प्रयत्न केला. काही स्थानिक युवकांच्या सतर्कतेमुळे ही चोरी टळली. चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या युवकांवर चोरट्यांनी दगडफेक केली. सुदैवाने यामध्ये कोणी जखमी झाले नाही.
वृषाली हनुमंत राऊत यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गु. र. नं.237/2022 भा द वी कलम 457,380,511 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार फिर्यादी यांचे सह्याद्री नगर हुडको कॉलनी येथील घरात तीन अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घराचा दरवाजा तोडून प्रवेश करून घरातील साहित्य विस्कटून फिर्यादीच्या घरामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. कॉलनी मध्ये चोरटे घुसल्याची माहिती समजताच कॉलनीमधील काही स्थानिक तरुणांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी तरुणांवर दगडफेक केली. तरुणांनी त्यांचा पाठलाग केला मात्र अंधाराचा फायदा घेऊन ते पसार झाले. सिसीटिव्ही कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद झाला आहे.
याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अजीज मिस्त्री हे पुढील तपास करत आहेत.

You cannot copy content of this page