Thursday, September 28, 2023
Homeमहाराष्ट्रहॉटेल व बार सुरु करण्यास शासनाची परवानगी... नियम व अटी लागू.

हॉटेल व बार सुरु करण्यास शासनाची परवानगी… नियम व अटी लागू.

अष्ट दिशा वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाने अनलॉक 5 अंतर्गत राज्यातील कंटेनमेन्ट झोन वगळता इतर क्षेत्रातील रेस्टॉरंट, बार, कॅफे, कॅन्टीन, डायनिंग हॉल 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याबाबत पर्यटन संचलनालयामार्फत शनिवारी आदर्श प्रणाली जारी करण्यात आली आहे.

त्यामध्ये रेस्टॉरंट, बार मधील दोन टेबल मध्ये किमान एक मीटरचे अंतर ठेऊन ग्राहकांची बैठक व्यवस्था करावी, आस्थापना चालकांनी सोशल डिस्टंसिंग व इतर खबरदारी संदर्भात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे.
विना मास्क ग्राहकांना परवानगी देऊ नये, थर्मल गनच्या साहाय्याने येणाऱ्या ग्राहकांची प्रवेशद्वारावर तपासणी करण्यात यावी, सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे आढळ्यास आत मध्ये येण्यास परवानगी देऊ नये, रेस्टॉरंट व बार मधील काउंटर, टेबल, खुडची इतर सर्व साहित्यांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
ग्राहकांच्या बैठक व्यवस्थेत दोन ग्राहकांमध्ये अंतर राहील याची खबरदारी घेण्यात यावी, रेस्टॉरंट व बार आस्थापना व्यवस्थापकांनी आपल्या कर्मचाऱ्यांची नियमित कोरोना तपासणी करावी, आपल्या आस्थापनामधील हवा खेळती राहावी म्हणून खिडक्या व दरवाजे खुले ठेवावेत, AC चा वापर करत असल्यास त्याचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे, ग्राहकांच्या राहण्याच्या ठिकाणी व रेस्टॉरंट, बार मध्ये ग्राहकांची गर्दी होणार नाही याची दक्षता आस्थापना व्यवस्थापकांनी घ्यावी अशा अनेक नियम व अटी लागू करत फक्त 50 टक्के क्षमतेने रेस्टॉरंट व बार चालवावे.
- Advertisment -