५२ वर्षीय हरीचंद्र मिरकुटे यांनी केली कोरोनावर यशस्वी मात…

0
179

खालापूर (दत्तात्रय शेडगे) तालुक्यातील मोरबे येथे राहणारे हरीचंद्र मारुती मिरकुटे वय ५२ यांनी कोरोनावर यशस्वी रित्या मात करून घरी परतले आहेत.हरीचंद्र मिरकुटे हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण न्यू पनवेल येथे सरकारी नोकरीला असून त्यांना १४ एप्रिल रोजी कोरोना आजार झाला त्यांची लागलीच खोपोली येथील जाखोटीया मध्ये ऍडमिट होत डॉ सतीश जाखोटीया यांनी त्यांच्यावर उपचार चालू केले त्यांनी १३ दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले असून असून डॉ सतीश जाखोटीया यांनी मोठ्या शर्थीने त्यांच्यावर उपचार केले.

तेरा दिवस उपचार घेतल्यानंतर अखेर त्यांनी कोरोनावर मात केली आहे ५२ वर्षीय हरीचंद्र मारुती मिरकुटे यांनी कोरोनावर मात केल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे मिरकुटे यांनी जाखोटीया हॉस्पिटलचे डॉक्टर सतीश जाखोटीया , माजी आमदार सुरेश लाड, मा. आमदार महेंद्र थोरवे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील. संतोष बांदल. प्रमोद मिरकुटे, अरुण भाऊ हरपुडे, व भाऊ शिवाजी मिरकुटे. महेंद्र मालकर, नाताजी मालकर यांचे आभार मानले आहे.