Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी कार्य - कर्तृत्वाचा केला सन्मान "..

” ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी कार्य – कर्तृत्वाचा केला सन्मान “..

” बहुजनांचे अभ्येद्य नेतृत्व ” वंचितचे ” धर्मेंद्रदादा मोरे ” यांची जिल्हा महासचिव पदी नियुक्ती !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) वंचित बहुजन आघाडीचे कर्जत तालुका अध्यक्ष ” धर्मेंद्र दादा मोरे ” यांची नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ” वंदनीय ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर ” यांनी ” रायगड जिल्हा महासचिव ” पदी नियुक्ती केली आहे . ऍड . बाळासाहेब आंबेडकर यांनी यानिमित्ताने त्यांच्या ” कार्य – कर्तृत्वाचा ” सन्मान केला असून आदिवासी – कामगार – कष्टकरी – गोर गरीब – अन्यायग्रस्त नागरिकांना नेहमीच न्याय – अधिकार देण्यासाठी अग्रेसर असणारे धर्मेंद्र दादा मोरे यांच्या कार्याला सन्मानित केले आहे . नुकतीच मुंबई येथे ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांना नियुक्ती पत्र देवून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

धर्मेंद्र दादा मोरे म्हणजे एक लढवय्या नेतृत्व ! आदिवासी , कामगार बहुल भाग असलेला हा कर्जत मतदार संघात कुणाची कामे होत नसतील , समाजावर अन्याय होत असेल , तर शासकीय अधिकारी वर्गांच्या विरोधात ” दंड थोपटून ” उभा रहाणारा लढवय्या , आंदोलनाच्या माध्यमातून कर्जतकर नागरिकांच्या नजरेत नेहमीच चर्चेत राहिला आहे .कर्जत पोलीस ठाण्यापासून कर्जत तहसील कचेरी पर्यंत तर वीज कंपनीच्या समस्येपासून ते नगर पालिकाच्या गलथान कारभारा विरोधात तर इतर ठिकाणी ग्रामीण भागातील नागरिकांना न्याय देण्यासाठी पंचायत समितीचे बिडिओ यांना नेहमीच जाब विचारणारे हे नेतृत्व आहे.

” वंदनीय बाळासाहेब आंबेडकर ” यांचे निकटवर्तीय असून त्यांच्या मुशीतच धर्मेंद्रदादा मोरे देखील तयार होऊन राजकीय क्षेत्रात कार्य करून उभारी घेत असताना दिसत आहेत , आजपर्यंत त्यांनी तालुक्यातील शेतकरी बांधवांचे प्रश्न असो की , राजनाला प्रकरण , भात खरेदी विक्री तक्रारी , अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांना झालेल्या शेतीच्या नुकसानीत भरपाई मिळण्यासाठी केलेले प्रयत्न , विजेच्या समस्येबाबत , वाढीव बिलाबद्दल , वीज कंपनीच्या अधिकारी वर्गाला विचारलेला जाब , महापुरुषांचे स्मारक , डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन प्रकरण , सोशल मीडियावर महापुरुषांबद्दल अपशब्द लिहिणा-यांना शिकविलेला धडा व त्यासाठी पोलीस यंत्रणेला गुन्हे नोंद करण्यास केलेले प्रयत्न , कोरोना काळात गोरगरीब नागरिकांना केलेली अन्न धान्यांची व गरजू वस्तू वाटप करून जपलेली सामाजिक बांधिलकी , कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य विषयी सोई सुविधा मिळण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांसाठी केलेले जिकरीचे प्रयत्न , पालिकेच्या वाढीव घरपट्टी – पाणीपट्टी विरोधात दिलेली झुंज , तर इतर न्याय हक्कासाठी केलेली उपोषणे , कर्जत संघर्ष समितीत त्यांचा सहभाग , अन्याय अत्याचाराविरोधात व परिसरातील तरुणांना रोजगार मिळण्यासाठी त्यांना दिलेली साथ , गुन्हेगारी क्षेत्राचा बिमोड करण्यासाठी अत्याचारग्रस्ताना केलेली मदत , या सर्वच क्षेत्रात त्यांची कार्य करण्याची असलेली धडपडीमुळे सर्वच शासकीय , खाजगी , व अन्य संघटन क्षेत्रात त्यांचा ” आदराने दबदबा ” आहे.
यापूर्वी ते वंचित बहुजन आघाडीचे कर्जत ता.अध्यक्ष पदावर काम करत असताना पक्षासाठी केलेले भरीव कार्य , केलेली आंदोलने , मोर्चे यांत त्यांचा सहभाग आग्रही असल्याने अल्पावधीतच पक्षाला त्यांनी तालुक्याच्या ग्रामीण भागापर्यंत नेऊन या पदाला साजेसा न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याने या त्यांच्या कार्य – कर्तुत्वाचाच सन्मान वंदनीय बाळासाहेब आंबेडकर यांनी केला असून त्यांची नियुक्ती जिल्हा महासचिव पदी केली आहे .त्यांच्या या नियुक्ती बद्दल कर्जत मतदार संघात राजकीय – सामाजिक – धार्मिक – शैक्षणिक – सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर – मित्र मंडळी – आप्तेष्ट – पक्षातील पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page