Monday, April 15, 2024
Homeपुणेमावळॲड.मोहम्मद फकी यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पदी नेमणूक ,वडगाव मावळ वकील संघटनेतर्फे...

ॲड.मोहम्मद फकी यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पदी नेमणूक ,वडगाव मावळ वकील संघटनेतर्फे भव्य सत्कार…

लोणावळा (प्रतिनिधी):ॲड.मोहम्मद फकी यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पदी नेमणूक.. वडगाव मावळ वकील संघटनेतर्फे सत्कार करण्यात आले.पुणे येथील ख्यातमान दिवाणी वकील अशफाक काझी यांचे ज्युनिअर ॲड.मोहम्मद कैसर फकी यांची कनिष्ठ दिवाणी न्यायधिश तथा प्रथमवर्ग नायदांडाधिकरी पदी नेमणूक करण्यात आली आहे.
पुणे येथील दिवाणी शाखेचे ख्यातमान वकील अशफाक काझी यांचे ज्युनिअर ॲड.म्हणुन त्यांच्या सोबत सण 2015 पासून काम करणारे मोहम्मद कैसर फकी यांची मेहनत आणि जिद्द यामुळे त्यांची दिवाणी न्यायाधीश तसेच प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी म्हणून मुंबई उच्च नायालयाने नुकत्याच घेतलेल्या परीक्षेत उत्तम यश संपादन करून त्यांची त्या पदी नेमणूक केली आहे. ते पुण्यातील ख्यातमान दिवाणी वकील ॲड.अशफाक काझी यांचे शिष्य असून त्यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली ॲड.मोहम्मद फकी यांनी हे उत्तम यश संपादन केले आहे.
यावेळी त्यांच्या या यशा बद्दल वडगाव मावळ वकील संघटनेतर्फे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला,तसेच सर्व सामाजिक स्तरातून व वकील वर्गातून त्यांचे व त्यांच्या गुरूंचे स्वागत करण्यात येत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page