if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी):जिल्हा परिषद केंद्रशाळा आंबवणे ता.मुळशी येथे यशवंतराव चव्हाण कला,क्रीडा महोत्सव अंतर्गत केंद्रस्तरीय विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन करून करण्यात आली.
या प्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत आंबवणे च्या नवनिर्वाचित सरपंच सौ.सीता मच्छिंद्र कराळे,उपसरपंच श्री.सुनील हुंडारे तसेच ग्रामपंचायत सदस्य-श्री.शरद जगताप,श्री निलेश मेंगडे,सौ.मेघा नेवासकर,सौ.अक्षरा दळवी, आंबवणे शा.व्य. समिती अध्यक्ष सौ.आशा मोडवे, सदस्य श्री.मनोज जंगम,सौ.संगिता नेवासकर,श्री.भानुदास पारकर ,आंबवणे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.विकास रासकर, मान्यवर व केंद्रातील शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला.तसेच त्यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.यास्पर्धेत प्रामुख्याने भजन,लोकनृत्य, कबड्डी,खोखो,धावणे,गोळा फेक,थाळी फेक,लांब उडी,उंच उडी,प्रश्नमंजूषा व वक्तृत्व इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.
विजेत्या स्पर्धकांचे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले व प्रमाणपत्र देण्यात आले.स्पर्धेत सहभागी केंद्रातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.विजयी खेळाडूंना बिटस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी केंद्रातील शिक्षक श्री.शाम बेंद्रे,श्री.लक्ष्मण येंदे,श्रीम.नलिनी फुलपगारे,श्री.राजू चिंचकर, श्रीम.रेश्मा झावरे,श्रीम.सीमा पाटील,श्री.रामचंद्र मदगे, श्री.मारोती सूर्यवंशी,श्री.भीमराव आखाडे, सौ.मनीषा कंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.