Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड…अखेर नेरळ चे डॉ.दिनकर सरोदे यांना न्याय मिळवून देण्यासाठी "पोलीस मित्र संघटना...

…अखेर नेरळ चे डॉ.दिनकर सरोदे यांना न्याय मिळवून देण्यासाठी “पोलीस मित्र संघटना “बसणार उपोषणाला !

नेरळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व इतर शासकीय अधिकारी वर्गाच्या पिळवणुकीमुळे नेरळचे प्रसिद्ध डॉ.दिनकर सरोदे हताश..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) सध्या कर्जत पंचायत समितीवर प्रशासकीय राजवट असल्याने पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या कारभारावर राजकीय दबाव दिसत नसल्यानेच ग्रामसेवक तसेच गटविकास अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचे चित्र कर्जतमध्ये दिसत आहे . गेली दिड वर्षे बांधकाम परवानगी घेण्यासाठी ग्रामपंचायत नेरळ , पंचायत समिती कर्जत , जिल्हा परिषद कार्यालय अलिबाग , जीवन प्राधिकरण तर नेरळ पोलीस ठाण्यात वयोवृध्द डॉ. दिनकर सरोदे व त्यांच्या पत्नी डॉ. सुनिता सरोदे न्याय मिळण्यासाठी खेटा मारत असून आजपर्यंत त्यांना मानसिक तणावाखाली आणून नेरळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक , गटविकास अधिकारी घराचे बांधकाम परवानगी देत नसल्याने हताश झाले आहेत.
मात्र त्यांच्या तक्रारीची दखल पोलीस मित्र संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष रमेशदादा कदम यांनी घेतली असून डॉ. सरोदे या वयोवृध्द दाम्पत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दिनांक १९ जुलै २०२३ पासून आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती डॉ . दिनकर सरोदे व पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष रमेश कदम यांनी प्रसार माध्यमांकडे दिली आहे.

कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे होत असताना , घर बांधण्यासाठी सर्व बांधकाम परवानग्या , कागदपत्रे देऊनही तसेच सर्व कर भरूनही राजकीय दबावाखाली येऊन , वरिष्ठांच्या आदेशाला न जुमानता ” हम करे सो , कायदा ” असा अजेंठा सध्या नेरळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गणेश गायकर हे वापरत असल्याचा आरोप सुगवेकर आळी येथील प्रसिद्ध डॉ. दिनकर सरोदे व त्यांच्या पत्नी डॉ .सुनीता सरोदे यांनी यापूर्वी केलेला असताना नेरळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्याकडे न्याय मागण्यांसाठी गेलेले डॉ.सरोदे यांना तेथेही न्याय मिळाला नसून कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे देखील मा. कार्यकारी अभियंता ( बांधकाम ) राजिप यांचा आदेश जुमानत नसल्याची वस्तुस्थिती डॉ.सरोदे यांनी या अगोदर स्पष्ट केली होती.
त्यामुळे मानसिक तणावाखाली आलेले डॉ. सरोदे शासकीय अधिकारी वर्गाने त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याची वेळ आणली असल्याचे मत देखील यापूर्वी मांडले असताना यानिमित्ताने नेरळ ग्रामपंचायतीचा ढोबळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

नेरळ ग्रामपंचायत हद्दीत सुगवेकर आळी येथे गेली ३० वर्षांपासून डॉ. दिनकर सरोदे व त्यांच्या पत्नी डॉ. सुनीता सरोदे या जुन्या घरातच प्राथमिक चिकित्सालय चालवीत होते.जुने झालेल्या घराच्या जागी नवीन बांधकाम करण्यासाठी त्यांनी नेरळ ग्रामपंचायती कडे बांधकाम परवानगी मागितली असता येथील ग्रामसेवक गणेश गायकर यांनी आजपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना त्रास देऊन पिळवणूक केली आहे.
शासन नियमानुसार डॉ. सरोदे यांचे बांधकाम दुरुस्ती १५० चौ. मी. च्या आतील व गावठाण हद्दीत असल्याने UDCPR मध्ये दिलेल्या तरतुदी नुसार ग्रामपंचायत नेरळ यांनीच बांधकाम परवानगी देणे गरजेचे असल्याचे मा. कार्यकारी अभियंता ( बांधकाम ) रायगड जिल्हा परिषद , अलिबाग यांनी आदेश दिलेले असतानाही व तसाच आदेश पंचायत समिती कर्जतचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी दिला असतानाही ग्रामसेवक गणेश गायकर यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत अद्याप पर्यंत डॉ. सरोदे यांना बांधकाम परवानगी दिलेली नाही.

याबाबतीत डॉ.सरोदे यांनी ग्रामपंचायती कडे विकास कर २५२ ९६० / – रू. व कामगार विकास शुल्क ११७७९ /- रू . इतका भरूनही व ग्रामसेवक गणेश गायकर यांना बांधकाम परवानगीची सर्व कागदपत्रे देऊनही ते कुणाच्या दबावाखाली येऊन बांधकाम रोखून धरत आहेत , बांधकाम करण्यास परवानगी का देत नाहीत ? इतका कर कसला , याची चौकशीसाठी व जेष्ठ नागरिक असलेले ७० वर्षीय डॉ. दिनकर सरोदे व त्यांच्या पत्नी दिड वर्षांपासून मानसिक तणावाखाली असल्याने त्यांची तक्रार पोलीस मित्र संघटनेकडे आल्याने आता ” बेजबाबदार शासकीय अधिकारी वर्गांचे कर्दनकाळ असलेले ” पोलीस मित्र संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष रमेश दादा कदम डॉ. सरोदे यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरसावले असून दिनांक १९ जुलै २०२३ रोजी आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती डॉ. दिनकर सरोदे व पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष रमेश दादा कदम यांनी दिली आहे . त्यामुळे या प्रकरणाकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page