if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
कर्जत प्रांताधिकारी संकपाळ यांनी सर्व मागण्या केल्या मान्य !
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील नागरिकांच्या ” न्याय हक्कासाठी ” स्वराज्य संविधान रक्षक सेना पॅंथर आर्मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पँथर सुशिल भाई जाधव व पॅंथर आर बी जगताप – प्रदेश उपाध्यक्ष हे दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कर्जत येथे आमरण उपोषणास बसले होते . तब्बल सहा दिवस उपोषण सुरू असताना यावर ठोस उपाय कर्जत तहसीलदार काढत नसल्याने उपोषणाची धार वाढत चालली होती . अखेर उपविभागीय अधिकारी कर्जत श्री. संकपाल यांनी सर्व मागण्या रास्त असून जनतेच्या हिताच्या असल्याने सर्व मागण्या मान्य करत लवकरच सोडविण्यात येतील असे , लेखी पत्र दिल्याने अखेर हे यशस्वी उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.
कर्जत तालुका हा आदिवासी बहुल व शेतकरी , कामगार , कष्टकरी , गोर गरीब वास्तव्यास असलेला तालुका असल्याने ग्रामीण भागातून शासकीय कामासाठी आल्यावर त्याची फरफट होवू नये , त्याला योग्य न्याय मिळावा , तर माथेरान मध्ये योग्य सोई सुविधा नसल्याने तेथील नागरिकांना कर्जत मध्ये येण्यासाठी होणारा त्रास वाचावा , तर नव्याने बांधण्यात आलेल्या ” प्रशासकीय भवनात ” जुन्या तहसील कचेरीत असलेले जुने अभिलेख हलविण्यात यावे , या भवनात इतर सोई सवलती असाव्यात , अश्या व ईतर अनेक लोकाभिमुख मागण्या घेवून पँथर आर्मीचे प्रदेश अध्यक्ष सुशिल भाई जाधव व प्रदेश उपाध्यक्ष आर बी जगताप हे कर्जतमध्ये ऊन , पाऊस , वादळ , वारा याची तमा न बाळगता आमरण उपोषणाला बसले होते.
यावेळी कर्जत तहसीलदार शीतल रसाळ यांनी येथे भेट देवून येथील सर्व माहिती कर्जत प्रांतधिकारी संकपाळ यांच्या समवेत चर्चा केली असता , मंगळवार दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजी मान. प्रांतधिकारी साहेब कर्जत श्री संकपाळ यांनी निवेदना मधील सर्व विषयातील मुद्दे मान्य केले असून सायंकाळी पाच वाजता उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले आहे .सदरच्या जनतेला सोई सुविधे बाबतच्या मागण्या आश्वासन देवून लवकरात लवकर न सोडविल्यास हे स्थगित केलेले उपोषण आम्ही पुन्हा सुरू करू , असा ईशारा पँथर आर्मीचे प्रदेश अध्यक्ष सुशिल भाई जाधव यांनी दिला आहे.
तर कर्जत तालुक्यातील सर्व ग्रामस्थ , माता – भगिनी , बंधुभाऊ , वडीलधारी वयोवृद्ध नागरिक , शेतकरी कामकरी , कष्टकरी , श्रमिक टेम्पो चालक , रिक्षा चालक , हात गाडी चालक , सर्व आजी-माजी पुढारी नेते , सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य , सभापती , सरपंच सर्व आजी-माजी पंचायत समिती सदस्य , सभापती , सर्व आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य सभापती , सर्व आजी-माजी आमदार , खासदार , सर्व पत्रकार बांधव , सर्व व्यापारी वर्ग , सर्व सामाजिक – राजकीय – धार्मिक – संस्था व पदाधिकारी , सर्व डॉक्टर , प्राध्यापक , वकील संघटना , सर्व शासकीय कर्मचारी , पोलीस , खाजगी कामगार व माझे सर्व समाज बांधव आदींनी मला प्रत्यक्ष किंवा प्रतिनिधी द्वारे , व्हाट्सअप संदेश , मोबाईल द्वारे दिलेल्या शुभेच्छामुळे मला सहा दिवस उपोषण करण्याकरिता आपल्याकडून ” शक्ती बळ ” मिळाले त्याबद्दल आपला सदैव आभारी राहील , असे मत पँथर आर्मीचे प्रदेश अध्यक्ष पँथर सुशिल भाई जाधव यांनी व्यक्त केले.