लोणावळा : केंद्रातील मोदी सरकारने सैन्य दलातील भरती प्रक्रियेत बदल करून आनलेल्या अग्निपथ नोकर भरती योजनेच्या विरोधात लोणावळा काँग्रेसचे धरणे आंदोलन करण्यात आले. अग्निपथ या योजनेमुळे युवकांचे मोठे नुकसान झाले असल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाने देशभरात केंद्र सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन सुरु केले आहे .या आंदोलनाला पाठिंबा देत आज लोणावळा शहरात काँग्रेस चे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या वतीने दिवसभर आंदोलन करण्यात आले.
यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कविश्वर , काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर , मावळ तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ , माजी अध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांच्यासह लोणावळा निरीक्षक नासिर शेख , माजी उपनगराध्यक्षा सिंधुताई कविश्वर , पुजा गायकवाड , संध्या खंडेलवाल , सुर्वणा अकोलकर , रवी सलोजा , यवक अध्यक्ष दत्ता दळवी, सर्फराज शेख फिरोज बागवान , सेवादल अध्यक्ष सुनिल मोगरे , जाकिर शेख , जे . बी . सिंग बक्षी , आनंद काळे , अय्याज शेख , योगेश गवळी , योगिता सांगळे , नंदा गायकवाड , सुनिता पाचरणे , तरनुप शेख , सत्तार शेख यांच्यासह काँग्रेसच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी या धरणे आंदोलनात सहभाग नोंदविला होता.