Saturday, July 19, 2025
Homeपुणेलोणावळाअध्यातमातून व्यक्तिमत्व विकास राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरातून अनुभवता येतो,नंदकुमार वाळंज...

अध्यातमातून व्यक्तिमत्व विकास राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरातून अनुभवता येतो,नंदकुमार वाळंज !

लोणावळा:एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. बी. पुरंदरे कला. श्रीमती एस. जी. गुप्ता. व श्रीमती. एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय लोणावळा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय विशेष हिवाळी शिबीराचे आयोजन आंबवणे येथे करण्यात आले. या शिबिराचे उद्धाटन कोराईगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व प्रसिद्ध उदयोजक नंदकुमार वाळंज यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनाच्या वेळी मार्गदर्शन करताना भारतीय संस्कृतीचा अभिमान युवा पिढीने जोपासला पाहिजे .आधुनिक काळात सुद्धा आपण आपले आद्यात्म जोपासले पाहिजे . व आपला विकास साधला पाहिजे असा संदेश अध्यक्षांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केला .
या वेळी लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे सचिव मा. अँड. निलीमा खिरे मॅडम स्वंयसेवकांना उद्देशून दूरदर्शन वरील दाखविलेल्या ग्रामीण भागातील मालिकेतील घटना, या प्रत्यक्ष खेडेगावात जाऊन अनुभवता येतात. ते शिबिरातून साध्य होते व अनेक गोष्टी जवळून अनुभवता येतात. असे आपल्या मनोगतातून त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना करताना डॉ. पवन शिनगारे जिल्हा समन्वयक यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व विषद केले.तसेच स्वयंसेवक शिबिरात राहून जे शिकणार आहेत ते पुढील काळात कसे फायदेशीर असते या विषयी माहिती दिली . स्वंयसेवकांना शिस्त व ग्रामीण भागातील जीवणमान समजुन घेण्याचे आव्हाण केले.
या कार्यक्रमाच्या वेळी लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्याचा सत्कार प्रभारी प्राचार्य डॉ. विलास पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आला.लो. ए. ट्रस्टचे उपाध्यक्ष दत्तात्रय पाळेकर, सहसचिव मा. अँड अजय भोईर, विश्वस्त सौ .शैलजा फासे,सी डी सी मेम्बर्स मा. विशाल पाडाळे, डॉ. दिगंबर दरेकर, उपसरपंच सुनिल हुंडारे,ग्रामसेवक राजेंद्र शिंदे , माजी नगरसेवक दिलीप दामोदरे , जयेशशेठ,उद्योजक मुंबई सौ. अक्षरा दळवी, अंबावणे ग्रामपंचायत सदस्य निलेश मेंगडे, सोनू अनाजी वाळंज विदयालयाचे मुख्याध्यापक बी जी. देवरे सर , शिक्षक, कर्मचारी व महाविदयालयाचे शिक्षकवृंद व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वंयसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एस.एस. स्वंयसेवक प्रतिनिधी जयवंत दळवी याने केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी धनराज पाटील सर यांनी केले .
- Advertisment -

You cannot copy content of this page