Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडअभिनव ज्ञान मंदिर गौळवाडी शाळेतील सन १९९२ च्या विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर संपन्न...

अभिनव ज्ञान मंदिर गौळवाडी शाळेतील सन १९९२ च्या विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर संपन्न !

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे) आज दि . ८ मे ” मदर डे दिनाचे ” औचित्य साधून कर्जत तालुक्यातील अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या गौळवाडी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सन – १९९२ च्या दहावीच्या बॅच चे गेट टूगेदर कर्जत मध्ये सर्व एकत्रित जमून साजरा करण्यात आला . यावेळी ” पाल्म ट्री ” या हॉटेलमध्ये सामूहिक जेवण करून त्यांनी आपला आनंद साजरा केला.यावेळी सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने व उत्साहाने उपस्थित होते.खूप वर्षांच्या शैक्षणिक कालावधी नंतर आज त्यांचे एकत्र येण्याचा योग जुळून आला.यावेळी त्यांनी त्यांच्या १० वी नंतरच्या पुढच्या वाटचालीचे अनुभव – आठवणी एकमेकांना सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला .त्यांच्या आठवणीत खूपच कुतूहल होते.एव्हढ्या वर्षांचे सुख – दुःख सांगताना सर्व जण देहभान विसरले होते , आपल्या कुटुंबाचेच सदस्य आहेत , असे सर्व आपले म्हणणे कथन करत होते.

त्याचप्रमाणे यापुढे आपली काय जबाबदारी आहे , काय ध्येय धोरण आहे , व्यावसायिक व कुटुंबाची कशी वाटचाल आहे , याचे हितगुज सांगत जेवणाचा कार्यक्रम पार पडला . कोरोना काळ व इतर अडचणींवर मात करत अखेर हा माजी विद्यार्थ्यांचा ” जुन्या आठवणींचे सिंहावलोकन ” हा कार्यक्रम फक्त आणि फक्त सुधागड पाली येथे वास्तव्यास असलेल्या आशा राणे व कर्जत मध्ये रहात असलेल्या उषा शिंदे यांच्या पुढाकारानेच प्रत्येक्षात उतरला.

त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच हे शक्य झाल्याने सर्वांनी त्यांचे आभार व्यक्त केले.यावेळी या गेट टूगेदर कार्यक्रमास कर्जत मधील संतोष भोज , देविदास जाधव , संतोष पाटील , प्रभाकर थोरवे , अरुण गायकवाड , संजय गायकवाड , रमण पाटील , बाबूभाई करणेकर , रमेश गायकवाड , आशा राणे , उषा शिंदे आदी सन १९९२ चे १० वी च्या बॅचचे विद्यार्थी उपस्थित होते . वेळेअभावी व कोरोना संसर्ग काळामुळे इतरांना संपर्क होऊ न शकल्याने आलेल्या सर्व उपस्थितांचे आभार संतोष भोज यांनी व्यक्त करून या गेट टूगेदर कार्यक्रमाची सांगता झाली , व पुन्हा भेटण्याचे अभिवचन घेऊन ते निघून गेले.

- Advertisment -

You cannot copy content of this page