Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडअभूतपूर्व गर्दीत व हास्याने धमाल उडवत भाजपाचे " हळदी कुंकू व खेळ...

अभूतपूर्व गर्दीत व हास्याने धमाल उडवत भाजपाचे ” हळदी कुंकू व खेळ पैठणीचा ” कार्यक्रम उत्साहात !

” ऍड . सुषमाताई ढाकणे ” यांचे नेत्रदीपक नियोजन..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )भारतीय जनता पक्षाच्या मा. युवती प्रमुख युवा मोर्चा – रायगड ऍड. सुषमा ताई ढाकणे यांनी अतिशय कमी वेळात केलेले नेत्रदीपक नियोजनामुळे कर्जतमध्ये आयोजित केलेले महिला भगिनी माहेरवाशीयांसाठी ” खेळ पैठणीचा ” हा आपल्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ स्वतःसाठी काढून आपल्या अंगातील सुप्त गुण दाखवून आनंदोत्सव साजरा करण्याच्या उदात्त हेतूने ” माहेरवासीण साठी ” उत्सवाची पर्वणी , आनंदाला गवसणी ” असा हास्यांनी धमाल उडवत व अभूतपूर्व गर्दीत ” वाण ” भेट देऊन हळदी कुंकू कार्यक्रम १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी रॉयल गार्डनच्या ओपन लॉन मध्ये मोठ्या जल्लोषात संपन्न झाला .

यावेळी प्रमुख उपस्थितीत सौ. मीना महेंद्र थोरवे , सौ. मनिषा भासे , सौ. शुभांगी सुरेश भाऊ लाड , सौ. नम्रता कांदळगावकर – भाजप महिला कर्जत ता. अध्यक्षा , जिल्हा नेत्या मृणालि खेडकर , जिल्हा उपाध्यक्षा स्नेहा गोगटे , मा.नगरसेविका बीनिता घुमरे , मा. नगराध्यक्ष शरद भाऊ लाड , भाजप ता. अध्यक्ष राजेश भगत , वर्षा सुर्वे , दर्शना बोराडे , रुपाली थोरवे , स्मिता दिनेश सविते , मा. नगरसेविका स्वामींनी मांजरे , सौ. हजारे , सौ. गवई , सह अनेक भाजप महिला पदाधिकारी व या खेळात उत्स्फूर्तपणे भाग घेण्यास तालुक्यातील महिला भगिनी उपस्थित होत्या . यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून महापुरुष व महा मातांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . तर सर्व सिने तारका , सिने अभिनेते , मान्यवर , यांचा सन्मान चिन्ह , शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी तालुक्यात अभूतपूर्व कामगिरी करणारे कराटे खेळात – भूषण बडेकर , दहिवली येथील कोमल पवार , किक बॉक्सिंग – सम्यक किरण गायकवाड , गिरीश प्रेमानंद नाईक , किरवली – वेट लिफ्टर गायत्री बडेकर , सापेले – वेट लिफ्टिंग अंजली येवले , मानसी केवारे , नॅशनल किक बॉक्सिंग ऐश्वर्या सुळे , विराज कांबळे , कुस्ती – विजय धुळे , यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी लकी ड्रॉ – सौ. अपर्णा अंकुश चव्हाण , दहिवली – कर्जत यांना तर प्रथम क्रमांक पैठणी व नोन्याची नथ – कोमल मनोज रावळ , द्वितीय क्रमांक कुलर – ऐश्वर्या पंदारे , तर तिसरा क्रमांक मिक्सर , अशी बक्षिसे देऊन सर्व विजेत्या महिलांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्व महिलांनी खास आकर्षण असलेल्या सिने तारका कावेरी घंगाळे , सिनेतारका – सुचिता चाटे , रायगड ब्युटी क्वीन्स – रिया अजिंक्य मालुसरे यांच्या दमदार एंट्री सह प्रविण सोंडकर – बोलके बाहुले फेम , सिनेस्टार – अवधुत कुलकर्णी यांनी दाखवलेल्या खेळात सुपरस्टार अमिताभ बच्चन च्या भूमिकेत ” ये साला…. कौन बनेगा करोडपती अए….हा डायलॉग भाग घेणाऱ्या महिलांनी बोलून सर्वांची ” हास्याची कारंजी ” उडे पर्यंत हसून हसून खूप मजा घेतली.

तरी या ” भव्य हळदी कुंकू व खेळ पैठणीचा ” या कार्यक्रमास सर्व महिला भगिनींनी या खेळात भाग घेऊन उल्लेखनीय नियोजन करून ” आनंदोत्सव ” साजरा करण्यास संधी देणाऱ्या आयोजक ” ऍड. सुषमा ताई ढाकणे – मा. युवती प्रमुख भाजप युवा मोर्चा , रायगड ” यांचे सर्वांनी कौतुक केले . या हास्य जत्रा कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रसिद्ध अँकर समिर सोमने यांनी केले .
- Advertisment -

You cannot copy content of this page