लोणावळा(प्रतिनिधी):मेरिटास हॉटेल्स & रिसॉर्ट व अमृता फौंडेशन , महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन दि.19/6/2023 रोजी मेरिटास पिकॅडल रिसॉर्ट येथे करण्यात आले.
यामध्ये मेरिटास रिसॉर्ट च्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत 59 युनिट रक्तदान केले.या रक्तदान शिबिराचे आयोजन मेरिटास चे CGM सुशील सर व Security Officer तसेच अमृता फाउंडेशन चे अध्यक्ष बालाजी गायकवाड यांनी केले असून हे शिबीरासाठी आधार ब्लड बँक पुणे व महालक्ष्मी ब्लड बँक,कराड आणि मेरिटास च्या सर्व विभागाच्या प्रमुखांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करत हे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले.अमृता फौंडेशन हे संपूर्ण राज्यभरात रक्तदान शिबीर राबवत आहेत.