लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आज रविवार दि. 21 रोजी वाकसई, करंडोली व वरसोली येथील गावठी दारू विक्रेत्यांकडे छापा मारत तब्बल सहा हजार पाचशे रुपयाची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.याबाबत पोलीस नाईक शरद जाधवर यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून महाराष्ट्र प्रोव्हीबिशन कायदा कलम 65( ई ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार शकील शेख हे होमगार्ड खेंगरे, होमगार्ड जाधव यांच्यासह वाकसई, करंडोली हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना शेख यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक व्यक्ती मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गालगत वरसोली हद्दीतील हिरो शोरूम जवळ गावठी दारू विकत आहे.
मिळालेल्या खात्रीशीर माहिती नुसार सदर ठिकाणी गेले असता त्यांना एक व्यक्ती पांढऱ्या बादली मध्ये गावठी दारू विकताना दिसला त्याला पोलीस आल्याचा संशय आल्याने तो पळ काढू लागला परंतु पोलीसांनी चतुराई ने त्याला पकडले व त्याच्या जवळ मिळून आलेली 2000 रु. किमतीची 20 लिटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली.
याप्रकरणी चरनसिंग पर्वतसिंग राजपूत ( रा. वरसोली, ता. मावळ, जि. पुणे ) याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात महाराष्ट्र प्रोव्हीबीशन कायदा कलम 65( ई ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारे रविवारी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी वाकसई, करंडोली व वरसोली हद्दीत केलेल्या गावठी दारू कारवाईत 35 लिटर असा एकूण रु. 6500 चा तयार गावठी दारूचा साठा जप्त करण्यात आला.
लोणावळा ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हवालदार शकील शेख हे करत आहेत.