Saturday, April 12, 2025
Homeपुणेलोणावळाआई एकविरा देवी माहेरघर देवघर येथून पालखीचे एकविरा गडाकडे प्रस्थान…

आई एकविरा देवी माहेरघर देवघर येथून पालखीचे एकविरा गडाकडे प्रस्थान…

लोणावळा : वाकसई आई एकविरा देवीचे माहेरघर देवघर येथे पारंपारिक नृत्य व वाद्याच्या गजरात शुक्रवारी देवीचे बंधू काळभैरवनाथ पालखी सोहळा संपन्न झाला.देवघर येथील श्री काळभैरवनाथ ट्रस्ट व बांधकाम समिती देवघर व देवघर ग्रामस्थ यांच्यावतिने या सोहळ्याचे संयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी चैत्र षप्टीला देवघर येथे एकविरादेवीचा भाऊ काळभैरवानाथ पालखी सोहळा पार पडत असतो, कोकण भागातून येणाऱ्या देवीच्या पालख्या देवघर येथे मुख्य गडावर जाण्यापुर्वी काळभैरवनाथ मंदिरात येतात व आई एकविरा व काळभैरवनाथ यांची भेट घडवत मंदिराला प्रदक्षिणा घालत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली जाते.
हजारोच्या संख्येने कोळी बांधव या मिरवणूकीत सहभागी होऊन काळभैरवनाथ महाराजांचे दर्शन घेत असतात.
श्री काळभैरवनाथ ट्रस्टच्या वतिने सकाळी काळभैरवनाथ मंदिरात अभिषेक करत मंदिर दर्शनासाठी खुले केले होते.
यावेळी काळभैरवनाथ ट्रस्ट अध्यक्ष गोंविद कौदरे, मंदिर जिर्णोध्दार समिती अध्यक्ष मारुती देशमुख ,उपाध्यक्ष किसन आहेर,सचिव अशोक कोदरे,सल्लागार महादु देशमुख,पो पाटील अनंता शिंदे, काळूराम देशमुख, अशोक रोकडे, धोंडू शिंदे,शंकर ढाकोळ,धोंडू आहेर,सुरेश शिर्के ,रविराज कोदरे,यशवंत आहेर,मधुकर पवार, गणेश देशमुख, गणेश आहेर, बाबाजी ढाकोळ,रविंद्र देशमुख, नवनाथ देशमुख यांच्यासह देवघर वाकसई सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page