लोणावळा: ग्रामीण पोलिसांची अवैध गावठी दारू तयार करणाऱ्या हात भट्टीवर कारवाई करत आठशे लिटर रसायन नष्ट केले. ही धडाकेबाज कारवाई मंगळवार (दि.12 ) मार्च रोजी वेहरगाव येथे केली.
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव परिसरात हातभट्टी चालू असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन ही कारवाई करण्यात आली. त्या ठिकाणी हातभट्टी चे चार बॅरेल प्रत्येकी 200 लिटर चे असे एकूण 800 लिटर हातभट्टी रसायन मिळून आले. ते हातभट्टी रसायन जागीच नष्ट करत पेटवून देण्यात आले.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक व पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक भारत भोसले, पोलीस उपनिरीक्षक सागर आरगडे, महिला पोलीस हवालदार पुष्पा घुगे, पोलीस नाईक किशोर पवार, पोलीस कॉन्स्टेबल सूरज गायकवाड, रवींद्र ठोंबरे, उत्तम सांडभोर यांच्या पथकाने केली. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.