लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळ्यातील वाय सी कलासेसचा ” गुरु द्रोणाचार्य 2023″ हा पुरस्कार देवघर येथील आदर्श क्लासेसचे संचालक हरिविजय महादू देशमुख यांना प्रदान करण्यात आला.
इयत्ता 10 वी मध्ये 99% निकाल लागल्याबद्दल उत्कृष्ठ क्लास संचालक म्हणून वाय सी क्लासेस आयोजित गूण गौरव पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार हरिविजय देशमुख यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मा. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मा. उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मा. शिक्षण मंडळ सभापती जितेंद्र कल्याणजी, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव निखिल कवीश्वर, सुभाष डेनकर, विजय रसाळ सर, वाय सी क्लासेसचे संचालक निवृत्ती दुडे सर आदी मान्यवर उपस्थित होते. हरीविजय सर हे मागील 2003 पासून विध्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देऊन 100% पर्यंत निकालाची परंपरा जपत आहेत.
देशमुख हे खाजगी शिक्षक असले तरी शिक्षणासाठीचे त्यांचे योगदान प्रशंसनीय असून त्या अनुषंगाने गुणवंत विध्यार्थ्यांबरोबर त्यांचाही गौरव होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन निवृत्ती दुडे सर यांनी यावेळी बोलताना केले.