लोणावळा : मावळातील वाकसाई चाळ येथील आदिवासी पाड्यावर आदिवासी चिमुकल्यांनी घेतला धुलिवंदनाचा आनंद.
मावळात अनेक आदिवसी वाड्या आहेत आणि सर्वच आदिवासी यांचे हातावर पोट असल्याने हे कुठला सण कसा साजरा करतात हे आपणास माहिती नसते कारण त्यांचे मनोगत व त्यांच्यातील सणाचा उत्साह पाहण्यासाठी एखादा सण आदिवासी कुटुंब व त्या चिमुकल्यांबरोबर साजरा करायला हवा.
आज धुलीवंदन दिनानिमित्त आमचे प्रतिनिधी खास वाकसई चाळ येथील आदिवासी पाड्यावर गेले असता तेथील प्रौढ मंडळीतर आपल्या उदरनिर्वाहासाठी घराबाहेर होती. परंतु घरी असलेल्या चिमुकल्यांना मात्र रंग खेळण्याचा उत्साह आवरता येत नव्हता, या आदिवासी चिमुकल्यांनी काही खाले पिले की नाही माहिती नाही परंतु त्यांचा रंग खेळण्याचा उत्साह पाहून खरोखरच मन भारावून गेले आहे.
मावळ तालुक्यात अनेक आदिवासी पाड्या असून असंख्य आदिवासी मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. त्यातूनच आपल्या मूलभूत गरजा भागवून, परिवाराचा भार सांभाळत आहेत.
त्यातूनच अनेक सणवार त्यांच्या परिस्थिती नुसार साजरे करत असतात.आज धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिनिधी खास आदिवासी पाड्यांवर धुलिवंदनाचा आनंद घेण्यासाठी गेले असता वाकसई चाळ येथील आदिवासी मुले खूप उत्साहाणे व आनंदमयी वातावरणात रंग खेळताना निदर्शनास आले.परंतु त्यांची एक गोष्ट मनाला भारावून गेली ती म्हणजे ही सर्व लहान मुले विना पाण्याची म्हणजेच फक्त कोरडे रंग एकमेकांना लावून धुलिवंदनाचा आनंद घेत होते.आदिवासी समाज इतर समाजाच्या दृष्टीने जरी मागासलेला असला तरी या आदिवासी समाजाला पाण्याचे मूल्य नक्कीच माहिती आहे व पाणी कसे वापरावे आणि पाण्याचा कसा वापर करावा याचे ज्ञान असल्याची प्रचिती आज प्रतिनिधीना मिळाली आहे.