आदीवासी भटका बहूजन संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने येलवाडी संतभुमी (अलकनिरंजन वसाहत) येथे विमुक्त दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी स्थानिकपालेरहिवासी अण्णामहाराज शिंदे यांनी भटक्या विमुक्त डवरी गोसावी समाजबांधवांच्या व्येथेचा पाडा वाचला,देश १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य झाला असेल तरी आमचे समाजबांधव डिटेंशन कॅम्प मध्ये कैद होते.
तब्बल १५ दिवसानी याच देशात राहून उशीरा तुरंगातून मुक्त करून भटके- विमुक्त घोषित करण्यात आले.प्रत्येक गावाचा प्रवास हा साडे तीन दिवसांचा आसायचा कालांतराने दोन तिन दशका नंतर स्थिरावलो परंतु अद्यापही कायम वास्तव्याचा लढा चालू आहे.
येलवाडी गायरान जागेवर माझ्या समाजासह , वैदू समाजाची देखील पालेवजा घरे सन १९९३ पासुन आहेत, पारंपरिक पद्धतीने बहूरूपी वेशात भिक्षूगिरी करून तसेच महिलावर्ग स्थानिक शेतकर्यांच्या शेतात शेतमजूर म्हणून आजपर्यंत कष्ट करतो परंतु स्थानिक रहिवासी, ग्रामपंचायत आम्हाला नागरीक म्हणून स्वीकारीत नाही व तसे हक्क देखील मिळू देत नाही. १००एकराच्या गायरानापैकी आमचे २० गुठेंत पालेवजा घरे असून आम्हाला, पिण्याचे पाणी देखील आजपर्यंत मिळत नाही , कि रहिवासी म्हणून कुठलेच कायदेशीर अधिकार जसे, मतदानाचा अधिकार, आधारकार्ड, रेशनकार्ड, मुलांचे जन्मदाखले,मृत्युची नोंद , विज, रस्ता, आरोग्य, शिक्षण या सर्वांपासून वंचित ठेवले असून तशाप्रकारचा न्यायलयीन लढा आम्ही विभागीय आयुक्त साहेबांपुढे पुराव्यानिशी चालू केला आहे.
शासन अजून किती पिढ्या आम्हास माणूस म्हणून व या देशाचे नागरिक म्हणून अडगळीत टाकणार हेच समजत नाही. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माऊली सोनवणे म्हणाले कि संविधानावर पुर्णपणे विश्वास असून निश्चित न्यायपालीका आपणांस न्याय देईल व आपली पुढील पिढी या देशाची नागरिक म्हणून ओळख मिळेल. प्रकाश सावंत म्हटले एकुण गायरान जागेवरील स्थानिक कायम अतिक्रमणाबाबत न बोलता ग्रामपंचायत आमच्या पालानां १९९५ झोपडपट्टी सुरक्षा असताना आम्हास १५१ अतिक्रमण निष्काशीत नोटीस देते म्हणजेच आमच्यावर जातद्वेषातून अन्याय करीत आहे.
यावेळी सभेचे अध्यक्ष पोलीस पाटील गायकवाड, शिवाजी शिंदे, नानामहाराज शेगर, अरूण मैराळे, दत्ता गोडसे, परमेश्वर जगताप, महेंद्र वंजारी, रमेश साळवे, हभप क्षीरसागर महाराज, भालेराव साहेब इ. स्थानिक शेकडो महिला पुरूष उपस्थित होते. शेवटी राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.