if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): माजी उपनराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोणावळ्यात आरोग्य मित्र फौंडेशन या सेवाभावी संस्थेची स्थापना करण्यात आली.
माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या संकल्पनेतून या संस्थेची स्थापना करण्यात आली असून यानिमित्त आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.लोणावळा परिसरातील गरीब व गरजू रुग्ण शासकीय आरोग्य सुविधांपासून वंचित राहतात अथवा त्यांना काही आरोग्य सुविधाबद्दल पुरेशी माहिती मिळत नाही अशा सामान्य नागरिकांसाठी “आरोग्य मित्र फौंडेशन” ची स्थापना करण्यात आली आहे.ही संस्था गरजूंना मेडिकल सुविधा उपलब्ध करून देणार तसेच आरोग्य विषयक उत्तम मार्गदर्शन ही करणार असल्याचे श्रीधर पुजारी यांनी सांगितले.
तसेच नागरिकांना आरोग्य विषयक योजनाची माहिती नसते,खाजगी हॉस्पिटल मध्ये सामान्य नागरिकांना खर्च परवडत नाही. या फौंडेशन मार्फत अशा सामान्य नागरिकांना योग्य मार्गदर्शन करणे, त्यांना फौंडेशन कडून मेडिकल च्या सेवा उपलब्ध करून देणे गरजूंना उत्तम मदत व मार्गदर्शन करणे हे या संस्थेचे कार्य असणार आहे.असे पुजारी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
तर गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी नव्याने स्थापन होत असलेल्या या संस्थेच्या पुढील कार्यासाठी श्रीधर पुजारी यांनी एक लाख रुपयांचा निधी दिला, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी 50000 हजार रु चा निधी.जाकीर खलिफा 11 हजार रु. निधी देण्यात आला.तसेच जेष्ठ नागरिक संघ लोणावळा यांच्याकडून 5 हजार रु. निधी भेट स्वरूपात देण्यात आला. आज पासून या आरोग्य मित्र संस्थेचे कामकाज सुरु झाले असून गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
यावेळी संस्थेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून संस्थापक अध्यक्ष श्रीधर पुजारी हे असून उपाध्यक्ष दिलीप आंबेकर,सचिव अभिजित गायकवाड,विशाल पाडाळे,खजिनदार राजू खंडेलवाल तर सदस्य अनंता गायकवाड,आशिष बुटाला, भरत पारख,चोपडा, हर्षल होगले, पांडुरंग तिखे, शौकत शेख हे असतील.