Wednesday, January 8, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडआपटा ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीची एकहाती सत्ता..

आपटा ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीची एकहाती सत्ता..

नवनिर्वाचीत भाजपा सदस्या मनिषा वाघे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.

खोपोली- दत्तात्रय शेडगे

पनवेल तालुक्यातील आपटा ग्रुप ग्रामपंचायतवर शिवसेना शेकाप महाविकास आघाडीचे अकरा सदस्य निवडून येत एकहाती सत्ता खेचून आणत आपटा ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकविला आहे.


यात शिवसेनेचे ४, शेकापचे ८ सदस्य निवडून येत एकहाती सत्ता राखण्यात यश मिळाल मात्र यात भाजप ला दोन जागा मिळाल्या असुन यात वार्ड क्रमांक मधून भाजप मधून निवडुन आलेले सदस्या मनीषा लक्ष्मण वाघे यांनी माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने भाजप मोठा धक्का बसला आहे.
वार्ड क्रमांक १ मधून शेकाप पांडुरंग चंद्रकांत लेंडे, शिवसेनेचे मनीषा लक्ष्मण वाघे,संगीता लक्ष्मण बावदाने, वार्ड क्रमांक २ मधून शेकापचे असद अशपाक पिठहू, शिवसेनेचे नाजनींन खलील पटेल, वार्ड क्रमांक ३ मधून शिवसेनेचे वृषभ वामन धुमाळ, शेकापचे वंदना शरद वाघे , वार्ड ४ मधून शेकाप मारुती अशोक चव्हाण, दामा मांडे, भाजप कीर्ती कदम, वार्ड क्रमांक ५ मधून शेकापचे मयूर परशुराम शेलार, निकिता दर्शन भोईर, गीता राजू देशमुख, हे सदस्य निवडून आले आहेत.


या ग्रामपंचायत मध्ये महाविकास आघाडीचे ११ सदस्य निवडून आले असून २भाजप चे सदस्य निवडणूक आले होते मात्र यातील मनीषा लक्ष्मण वाघे यांनी माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भोईर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने भाजप ला मोठा धक्का बसला आहे, तर यावेळी माजी आमदार भोईर यांनी नवनिर्वाचीत सदस्य यांचा यथोचीत सत्कार केला.


यावेळी शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, उपतालुका प्रमुख अशोक थोरवे झ संघटन सुधीर पाटील, युवासेना विभाग प्रमुख स्वप्नील भोवड, शेकापचे जेष्ठ नेते गणेश सावंत, सारसाई शाखाप्रमुख लक्ष्मण बावदाणे , आपटा शाखाप्रमुख राजेंद्र घोलप, उपशाखाप्रमुख संजय आंबवणे , गणेश थोरवे, इलियास दळवी, फैयज बुबरे नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य नाजनिन पटेल, मारुती चव्हाण, पांडुरंग लेंडे, संगीता बावदाने लक्ष्मण झोरे, महादेव कदम, माधवी कदम, भास्कर ढेबे, मारुती पवार, मुबिन सय्यद, इकबाल चाचा, अनिल शिद, कुणाल थोरवे, स्वप्नील मेहतर, हेमा शिद, ,आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया-
नुकताच पार पडलेल्या आपटा ग्रामपंचायत मध्ये शिवसेना शेकाप महाविकास आघाडीची एकहाती सत्ता आली असून यात भाजपचे दोन सदस्य निवडून आले होते. मात्र त्यातील वार्ड क्रमांक १ भाजप मधून निवडून आलेले मनीषा लक्ष्मण वाघे यांनी माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला, यामुळे महाविकास आघाडीत अजून एका सदस्यांची भर पडली असून भाजप कडे मात्र आता एकच सदस्य राहिला आहे.
लक्ष्मण बावदाने शाखाप्रमुख- शिवसेना सारसई आपटा.
- Advertisment -

You cannot copy content of this page