जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकाविला..
प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
राज्य पूरस्कृत योजने अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेत आपटा ग्रामपंचायतला दुसरा क्रमांक मिळून महा आवास अभियानात उत्कृष्ट कामगिरी करत सर्वकृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार मिळाला, 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिनाचे औचित्य साधत आज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण विभागामार्फत महा आवास अभियान पुरस्कार राबविण्यात आले यात जिल्हास्तरीय दुसरा सर्वकृष्ट ग्रामपंचायत म्हणून आपटा ग्रामपंचायतला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पनवेल तालुक्यातील अतिशय प्रतिष्टेची ही ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतने गावाच्या विकासासाठी सर्व योजना राबविल्या, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ही ग्रामपंचायत नेहमी अग्रेसर असतात.
पनवेल तालुक्यातील या आपटा ग्रामपंचायत ला सर्वोकृष्ट ग्रामपंचायत म्हणून गौरविण्यात आले असून जिल्हात दुसरा क्रमांक मिळाला, त्यांना पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळीं आपटा ग्रामपंचायतचे सरपंच निकिता दर्शन भोईर, सदस्या संगीता लक्ष्मण बावदाने, गीता राजू देशमुख, सदस्य मयूर शेलार ग्रामसेवक नवनाथ शेंडगे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण बावदाने दर्शन भोईर भास्कर ढेबे आदी उपस्थित होते.