Wednesday, December 4, 2024
Homeपुणेलोणावळाआपल्याला घडविले त्या शाळेला मदतीचा हात म्हणून माजी विध्यार्थ्यांनी दिला मिनी प्रोजेक्टर..

आपल्याला घडविले त्या शाळेला मदतीचा हात म्हणून माजी विध्यार्थ्यांनी दिला मिनी प्रोजेक्टर..

लोणावळा (प्रतिनिधी):सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे येथे सन 2010- 11 च्या इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्याला घडवणाऱ्या शाळेला मदतीचा हात म्हणून मिनी प्रोजेक्टर भेट दिला.
याप्रसंगी दिनेश दळवी,संजय मानकर,लक्ष्मन हिरवे,प्रदीप हुंडारे,पियुष मोढवे विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष मा. नंदकुमार वाळंज यांनी शाळेच्या विकासात माजी विद्यार्थ्यांनी हातभार लावावा असे आवाहन केले होते.त्यास उत्तम प्रतिसाद मिळाल्याने सर्व माजी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले.मुख्याध्यापक श्री भटू देवरे,रविंद्र सोनवणे,संजय कुलथे, बाळासाहेब खेडकर, राहुल आवळे, विजय दळवी, सौ. शालिनी देवरे, संतोष दळवी,महादेव खेडकर आदी शिक्षक – कर्मचारी यांच्या कडे मिनी प्रोजेक्टर सुपूर्त केला.

“नवीन तंत्रज्ञानातून शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्य घटक समजणे अधिक सोपे व आनंददाई होईल”असे श्री देवरे यांनी या वेळी सांगितले व सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले.तसेच शाळेस मदत केल्याने सर्व माजी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page