Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडआपल्या घरातही छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले ,तर हा समाज सुधारू शकेल-राष्ट्रपती...

आपल्या घरातही छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले ,तर हा समाज सुधारू शकेल-राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या ठमाताई पवार..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आदिवासी कातकरी समाज अजूनही सर्व क्षेत्रात उन्नती घेण्यास कोसोदुर असून ” शिक्षण – संस्कार – नशामुक्ती – अंधश्रद्धा ” यामध्ये प्रगती झाल्यास हा समाज नक्कीच इतर समाजाच्या बरोबरीत येईल , मात्र आई वडील वीटभट्टी , मोलमजुरी , अशी कामे करण्यासाठी गाव सोडून जात असल्याने त्यांच्या मुलांना शिक्षण घेता येत नाही . इतर समाज आदिवासी कातकरी समाजासाठी योगदान देत असल्याने आपण हि कातकरी या माझ्या समाजासाठी काम करायला पाहिजे , या उद्दात हेतूने प्रेरित होवून ” स्वयंपाकीण ते राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या ” सौ . ठमाताई पवार यांनी आपला जीवनपट उलगडताना आपले अमूल्य मत व्यक्त केले . देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२३ रोजी कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव येथील ” अरिहंत आलोकी ” या गृहसंकुलाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता , यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आले होते . राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या सौ. ठमाताई पवार व पत्रकार सुभाष सोनावणे यांच्या शुभहस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले.

आदिवासी व कातकरी बांधवांसाठी सामाजिक – शैक्षणिक व
त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार विजेती प्राप्त सौ. ठमाताई पवार उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की , प्रत्येकाला वाटते शेजारच्या घरात छत्रपती जन्माला यावे , मात्र प्रत्येकाच्या घरात ” शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज ” ज्यावेळी जन्माला येतील , तेंव्हाच हा सर्व समाज सुधारू शकेल, यावर प्रकाश टाकला . मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न पाळता जसे मुलीला आपण लवकर घरी येण्यास सांगतो , तसेच मुलाला देखील सात च्या आत घरात येण्यास सांगणे गरजेचे आहे , हे सांगताना मुलगा कसा संस्कारी निघाला तर मातेला शाबासकी मिळते , तसेच जर तो मुलगा असंस्कारी , वाईट प्रवृत्तीचा निघाला तर त्या मातेलाच दोष दिला जातो , म्हणून महिलांनी मुलांना संस्कार शिकविणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्कारच महिलांचा सन्मान करण्यास शिकवितो , व तेंव्हाच महिलांवर अन्याय अत्याचार होणार नाहीत , यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला , तर आपल्या घरात दोन मुले असतील तर एक मुलगा देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर पाठवा , असा मोलाचा सल्ला देखील त्यांनी उपस्थितांना दिला . कर्जत तालुक्यातील गौरकामथ सारख्या ग्रामीण भागात रहाणाऱ्या सौ. ठमाताई पवार ” स्वयंपाकीण ते राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या ” होताना आपल्या हातून आदिवासी कातकरी समाजासाठी अनेक उल्लेखनीय कार्य घडले , याचा जीवनपट त्यांनी कथन केला . शहरात रहाणारे शहरवासी , ग्रामीण भागात रहाणारे ग्रामीणवासी तर वनात रहाणारे वनवासी जरी असले तरी आपण सर्व ” भारतवासी आहोत ” , हे त्यांनी सांगून देशासाठी लढणाऱ्या जवानांना सैल्युट केला.
यावेळी पत्रकार सुभाष सोनावणे यांनी येथील सर्व सुविधा पुरविण्यास आम्ही नेहमीच कटिबध्द असू , असे मत व्यक्त केले . संतोष पाटेकर – भूगर्भ पाणी तंत्रज्ञ यांनी ” पाणी हेच जीवन आहे ” पाण्याचा वापर पूरक करा झाडे लावा , असा संदेश दिला , तसेच अरिहंत आलोकि संकुलातील सोसायटीच्या पदाधिकारी यांनी देखील मार्गदर्शन केले , यावेळी अनेकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मा. सौ. ठमाताई अनंता पवार – राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या , मा. श्री. सुभाष सोनावणे – पत्रकार, कर्जत वार्ता , मा. श्री. संतोष पाटेकर – भूगर्भ पाणी तंत्रज्ञ , तसेच अरिहंत आलोकी रहिवासी हलिमा अन्सारी , संजना जगताप , चित्रा घुटे , रूपल कोथळेकर , रीना रॉय , मीना मौर्या , सपना गुप्ता , अमृता काटे , आरती शिंदे , स्मिता मोरे , मिनाक्षी मोरे , प्रसन्ना रेड्डी , विजय मोरे , किरण मोरे , हरिश्चंद्र गरुड , हनुमंत शिंदे , केशवा रेड्डी , सुधीर कुलकर्णी , सुनील घुटे , परितोष मंडळ , त्याचप्रमाणे अनेक रहिवासी या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवून देशाच्या तिरंगा ध्वजास सलामी दिली.
- Advertisment -

You cannot copy content of this page