Wednesday, October 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" आमचा नेता - उमेदवार व चिन्ह फक्त सुधाकर भाऊ घारेच "…

” आमचा नेता – उमेदवार व चिन्ह फक्त सुधाकर भाऊ घारेच “…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भूकंप , सर्व पदाधिकारी यांचे सामूहिक राजीनामे !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा हातामध्ये आल्यापासून ” पायाला भिंगरी ” लावल्या सारखी ” विकास कार्ये ” करून जनतेच्या मनात जागा करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत खालापूर मतदार संघाचे नेते तथा राजिप चे मा. उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामूहिक राजीनामे देवून ” भूकंप ” केला . आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात सुधाकर भाऊ घारे यांनी या निवडणुकीत आपल्या उमेदवारीबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी सोमवार दिनांक २२ ऑक्टोंबर २०२४ संध्याकाळी ७ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी त्यांनी आपण ” अपक्ष ” उमेदवारी घेवून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे सांगितले .

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत मित्र पक्ष असल्याने सुधाकर भाऊ घारे इच्छुक असूनही त्यांना येथून उमेदवारी मिळाली नाही . त्यामुळे त्यांना उमेदवारी लढवायची असल्याने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दर्शविला असून सर्व पदाधिकारी यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत . माझ्या पाठीशी माझे कार्यकर्ते , माझी संघटना असल्याने मी निवडणूक लढणार व विजयी होणार , असे मत त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले . यासाठी मी इतर कुठल्याच पक्षात जाणार नसून ” अपक्ष ” निवडणूक लढणार आहे . येथील जनतेला ” न्याय ” देण्यासाठी व येथील ” अन्याय अत्याचार ” संपविण्यासाठी हि निवडणूक मी लढणार आहे , असे त्यांनी घोषित केले.

२५ तारखेला सर्व ताकदीनिशी आम्ही उमेदवारी अर्ज भरणार असून मत मोजणीच्या दिवशी आम्ही येथील आमदार महेंद्र थोरवे यांचा ” करेक्ट ” कार्यक्रम करणार , असे जाहीर करताच कार्यकर्त्यांनी घोषणा देवून सभागृह दणाणून सोडले . ” आमचा नेता , उमेदवार व चिन्ह फक्त सुधाकर भाऊ घारे च ” असल्याचे चित्र यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय , बाहेरचा परिसर कार्यकर्त्यांनी तुडूंब भरला होता . सर्व कार्यकर्त्यांत जोशपूर्ण वातावरण होते . त्यांच्या अपक्ष उमेदवारी मुळे या मतदार संघात आता ” तिरंगी ” लढत होणार असून हि निवडणूक ” विजयी ” होण्यासाठीच लढणार असल्याने त्यांनी स्पष्ट केल्याने हि निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे . सुधाकर भाऊ घारे यांचे आजपर्यंतचे कार्य , ग्रामीण भागात केलेली मदत , त्यांचा संपर्क व त्यांच्या पाठीशी असलेली कार्यकर्ते , महिला आघाडी यांच्या ताकदीच्या जोरावर ते ” बाजी ” मारणार का ? याकडेच आता सर्वांचेच लक्ष लागून आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page