Saturday, November 23, 2024
Homeपुणेलोणावळाआमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, लोणावळा...

आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, लोणावळा शहर भाजपा ची मागणी..

लोणावळा (प्रतिनिधी): माननीय आमदार केंद्रीय मंत्री नारायणरावजी राणे साहेब यांच्यावर शिवराळ भाषेत टीका टिप्पनी करून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आमदार भास्कर जाधव यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याबाबत आज लोणावळा शहर भाजपच्या वतीने लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे आम्ही एक सर्व सामन्य भारतीय नागरीक आहोत , दिनांक 18 ऑक्टोंबर 2022 रोजी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे कुडाळ येथे शासकीय कार्यालयाच्या विरोधात नियमबाहय सभेत आले होते . सदर ठिकाणी आलेले असताना त्यांनी आपल्या भाषणात अतिशय चित्र विचीत्र आवाजात केंद्र मंत्री राणेसाहेब तसेच त्यांच्या कुटुंबीय यांच्यावर अतिशय घाणेरडया भाषेत टीका केलेली आहे .
भास्कर जाधव यांचे कृत्य हे एका मनोरुग्णाप्रमाणे होते व कोणत्याही लोकशाहीला धरून नाही तसेच सदर व्यक्ती ही कायम आक्रमक बोलून दोन पक्षातील कार्यकर्त्यामध्ये म्हणजेच समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे .

तरी सदर भाषणाची दखल घेवुन आपण भास्कर जाधव यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 153 अ , 505 ( 1 ) ( 3 ) , 500, 504 याप्रमाणे गुन्हा दाखल करावा व त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भाजपा च्या वतीने निवेदनात करण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उप नगराध्यक्ष श्रीधर पुजारी, अभय पारेख,ललित सिसोदिया ,मावळ तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष शौकत शेख,मावळ तालुका चित्रपट अध्यक्ष सागर बेलुरे, खंडाळा भाजपा अल्पसंख्याक अध्यक्ष साजिद बेपारी, शारुख शेख, दिपक विकारी,कादिर मुगल,आशिष गुप्ता, रिजवान खान,सोहन माथरे, फरीद बेपारी,दीपक कनोजिया, सचिन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page