Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडआमदार महेंद्रशेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना कर्जत शहर आयोजित होणार दहिहंडी उत्सव...

आमदार महेंद्रशेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना कर्जत शहर आयोजित होणार दहिहंडी उत्सव २०२३…

भिसेगाव -कर्जत ( सुभाष सोनावणे ) भारतीय संस्कृती व एकात्मता , संघटन व बंधुता याचे दर्शन घडविणारा उत्सव म्हणजे दहीहंडी. नेहमीच अश्या उत्सव व सणांना प्राधान्य देवून तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना कर्जत शहर यांच्या सुनियोजित कार्यक्रमा पैकी ” दहीहंडी उत्सव – २०२३ ” यावर्षी देखील आकर्षक बक्षिसे व मनोरंजनात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

” मित्रांनो थराला या नाहीतर धरायला या आपलं समजून गोविंदाला या ” असे आवाहन कर्जतकर नागरिकांना करत यावर्षी दहिहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांना प्रथम पारितोषिक (खुले) रु. १,११,१११/- तर सहा थराच्या सलामीसाठी रु. ११,०००/- व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे .( फक्त कर्जत तालुक्यासाठी ) प्रथम पारितोषिक रु.३१,९९९/- , पाच थराच्या सलामीसाठी रु. ६,०००/- व सन्मानचिन्ह (फक्त कर्जत साठी ) . असा अतिशय चित्त थरारक हा दहिहंडी उत्सव गुरुवार दिनांक ७ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ – ०० वाजता , रॉयल गार्डन शेजारील मैदान, कर्जत – रायगड येथे होणार आहे.

सदरील हा दहीहंडी उत्सव कर्जत तालुका मर्यादित असून यांत पुरुष गोपालांसाठी लक्की ड्रॉ प्रथम पारितोषिक टीव्ही , द्वितीय पारितोषिक सायकल , तृतीय पारितोषिक मोबाईल तर महिला गोविंदास लक्की ड्रॉ प्रथम पारितोषिक पैठणी , द्वितीय पारितोषिक मिक्सर , तृतीय पारितोषिक इस्त्री अशी बक्षिसांची खैरात असून या साथीला गोविंदा पथकांना दहीहंडी फोडण्यात उत्साह यावा म्हणून खास आकर्षण ” राजा आदईकर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा – ओम साईराज ” मराठी व हिंदी गाण्यांचा अनोखा नजराणा , असा हा बहारदार दहीहंडी उत्सव ” कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना कर्जत शहर ” आयोजित होणार आहे.
अधिक माहितीसाठी दिनेश कडू मो. 8108602912 व राकेश दळवी मो. 8888182079 या शिवसेना कमिटी पदाधिकारी यांच्याकडे गोविंदा पथकांनी संपर्क करावा , असे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page