Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड." आमदार महेंद्र शेठ थोरवे ठरणार राजकारणातील एक्का "

.” आमदार महेंद्र शेठ थोरवे ठरणार राजकारणातील एक्का “

” शिवतीर्थ ” शिवसेनेच्या जाहीर मेळाव्यात अनेक दिग्गजांचा होणार पक्ष प्रवेश !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) विधानसभेच्या निवडणुकीस आता काही दिवसच शिल्लक असल्याने कर्जत खालापूर मतदार संघात त्या निमित्ताने खूपच मोठे ” हलाहल ” होताना दिसत आहेत . या निमित्ताने विरोधकांच्या ” चारी मुंड्या चीत ” करण्यासाठी कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी आपले ” ब्रम्हास्त्र ” बाहेर काढले असून ” सौ सोनार की , एक लोहार की ” हे बोल बाजूला ठेवून त्यांनी मित्र पक्षातील हित शत्रू , विरोधक , व इतर पक्षातील बड्या नेत्यांना देखील ” चितपट ” केल्याचे ” शिवतीर्थ पोसरी ” येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणारा कर्जत खालापूर मतदार संघातील अनेक दिग्गजांचा पक्ष प्रवेश याचा ” साक्षीदार ” ठरणार आहे .
शिवतीर्थ पोसरी , कर्जत येथे रविवार दिनांक ०१ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघाचा शिवसेनेचा जाहीर मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष , व इतर पक्षातील अनेक दिग्गज प्रमुख पदाधिकारी व स्थानिक नेत्यांचा यांत पक्ष प्रवेश होणार असल्याने , या पक्ष प्रवेशाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे . या सोहळ्या निमित्ताने कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या पक्ष संघटनेची ” चुणूक ” दिसणार असून ते कर्जत खालापूर मतदार संघात सर्व पक्षांना ” धक्का ” देत ” अव्वल ” ठरणार आहेत.

या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून रायगडचे पालकमंत्री मा.श्री. उदयजी सामंत मा. श्री. श्रीकांतजी शिंदे – खासदार कल्याण , मा.श्री. श्रीरंग आप्पा बारणे खासदार – मावळ , मा.सौ. मिनाताई कांबळी – शिवसेना नेत्या , मा. श्री. भरतशेठ गोगावले आमदार , महाड , मा.श्री. महेंद्रशेठ दळवी आमदार , अलिबाग , दस्तुरखुद्द कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ सदाशिव थोरवे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ , आदी प्रमुख मान्यवर उपस्थित रहाणार आहेत . त्यामुळे या भव्य दिव्य पक्ष प्रवेशाकडे संपूर्ण रायगडचे लक्ष लागून आहे.

तरी या जाहीर मेळावा व पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी कर्जत व खालापूर तालुक्यातील शिवसेना – युवासेना – महिला आघाडी – युवती सेना – अल्पसंख्याक सेल – आदीवासी सेल – शिवउद्योग सेना – वाहतुक सेना – वैद्यकीय मदतकक्ष – कॉलेज कक्ष तसेच अंगीकृत संघटनेच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे , असे आवाहन निमंत्रक संभाजी जगताप – तालुका प्रमुख कर्जत , संदेश पाटील – तालुका प्रमुख खालापुर , सौ. रेश्मा म्हात्रे – महिला तालुका प्रमुख कर्जत , सौ. रेश्मा आंग्रे – महिला तालुका प्रमुख खालापुर , अमर मिसाळ – तालुका अधिकारी कर्जत , रोहित विचारे – तालुका अधिकारी, खालापूर यांनी केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page