Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडआमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या कामाची हिच पोच पावती-मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब..

आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या कामाची हिच पोच पावती-मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आजच्या या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वास्तूंच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहिलेला ” रेकॉर्ड ब्रेक ” जनसमुदाय महा सागरा सारखा असून यांत श्री सदस्य , वारकरी , टाळकरी , जेष्ठ नागरिक , शिवप्रेमी , सांस्कृतिक प्रेमी , भजनी मंडळी , राजकीय – सामाजिक – धार्मिक क्षेत्रातील मान्यवर , भगिनी , तरुण – तरुणी बघुन आपल्या कामांची हि पोच पावती असून या महापुरात विरोधक वाहून जातील , असे कौतुकास्पद मत राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांनी कर्जत येथील आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ” ऐतिहासिक वास्तूंच्या ” लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यास पोलीस मैदान – कर्जत येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे , खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार सदाभाऊ सरवणकर, ह.भ.प. दादा महाराज राणे, ह.भ.प. रामदास महाराज पाटील, ह.भ.प. हरिश्चंद्र महाराज जाधव, ह.भ.प. रामदास महाराज सावंत, ह.भ.प. भरत महाराज देशमुख, ह.भ.प. रामचंद्र महाराज पिंगळे, ह.भ.प. काशिनाथ महाराज वाघुळे, ह.भ.प. गुरुवर्य महादेव महाराज मांडे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज येरम, ह.भ.प. कृष्णा महाराज लांबे, ह.भ.प. बळीराम महाराज पवार, ह.भ.प. कैलास महाराज भोईर तसेच जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर , महिला जिल्हा संघटिका रेखा ठाकरे , उपजिल्हा प्रमुख भाई गायकर ,संघटक पंकज पाटील , शिवराम बदे , मा. सभापती मनोहर दादा थोरवे , तालुका प्रमुख संभाजी जगताप , बाळाजी विचारे , आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड , आरपीआयचे नगरसेवक राहुल डाळींबकर , नगरसेवक संकेत भासे , शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , संघटक नदीम भाई खान, त्याचप्रमाणे कर्जत खालापूर तालुक्यातील शिवसेना , युवासेना व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी कमी वेळात कामांचा जो डोंगर उभा केला आहे , त्याची शाबासकीची थाप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देत , निधी कसा आणायचा , हे थोरवे यांना बरोबर माहित आहे , ही गर्दी त्यांच्या कामाची पोच पावती आहे , गर्दीचा रेकॉर्ड तोडला आहे , असे कौतुक केले. प. पू. नानासाहेब धर्माधिकारी यांनी त्यांचे आयुष्य लोकार्पण केलं , इतरांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला , घराघरात मनामनात पोहचण्याचे महान कार्य केले , अनेक श्री सदस्य या कार्यक्रमात आपण पाहिले , दुःखाचा डोंगर येतो तेंव्हा कुणीतरी पाठराखण असावा लागतो , म्हणूनच इथे नदीच्या काठी ” साक्षात पांडुरंग ” उभा केला आहे , तुम्ही सुखी रहा , आनंदी रहा , अशी कृपादृष्टी ठेवणार आहे , वारकरी सांप्रदाय हा समाज घडविण्याचे काम करत असतो , नदीचा संगम , प्रती आळंदी पंढरी येथे वसली आहे , तर शिवसृष्टी येथे आहे , गड कोट देखावा , शूरवीर संभाजी महाराज यांचे स्मारक उभे केले , या वास्तू पहाण्यासाठी साक्षीदार म्हणून तुम्ही उपस्थित राहिले , याबद्दल उपस्थितांची त्यांनी वाहवा केली.

आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण नागरिकांच्यासाठी मी खर्ची करणार , तुम्ही जर आमदार महेंद्र थोरवे यांना निवडून दिले नसते तर मला हा चांगला सवंगडी भेटला नसता , यावर त्यांनी प्रकाश टाकला . ही शिवसेना ” बाळासाहेबांनी ” मोठी केली , ” शिवसैनिकांनी ” मोठी केली , घरा दारावर तुळशी पत्र ठेवले , शिवसेना अडचणीत येत आहे , काहीतरी अघटीत घडणार आहे , हे समजल्यावर बाळासाहेबांची शिकवण आठवली , अन्याय सहन करू नका , म्हणूनच आम्ही पाऊल उचलले व शिवसैनिकांना न्याय दिला . धर्मवीर आनंद दिघे साहेबांची आठवण त्यांनी याप्रसंगी काढली . शिवसैनिकाला काही नाही मिळाले , तरी शिवसैनिक नाराज होणार नाही , बाळासाहेबांचे स्वप्न साकार करणाऱ्यांबरोबर आम्ही सरकार मध्ये सामील झालो , बाळासाहेबांचे विचार – दिघे साहेबांचे आशीर्वाद व धनुष्य बाण आपल्या सोबत आहे , हे ही त्यांनी सांगितले.

आज महाराष्ट्रात असंख्य योजना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले . म्हणूनच मी ” नो सी. एम. , मी कॉमन मॅन आहे ” . टिका करणाऱ्याला मी कामातून उत्तर देणार , म्हणूनच ५० आमदार १३ खासदार आपल्याकडे आहेत , तर ग्रामपंचायत निवडणुकीत महायुती १ नंबर वर आहे ,असा राजकीय प्रवास त्यांनी सांगितला . येथे भरघोस निधी दिला आहे तर पेन अर्बन बँकेचा तिढा लवकरच सोडवू , १०० बेड चे सुसज्ज हॉस्पिटल कर्जतमध्ये उभारणार , ५ कोटीचां निधी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन साठी देणार , कर्जतच्या पाणी स्कीम साठी निधी देणार , असे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी मांडलेल्या सर्व समस्या त्यांनी सोडवणार असल्याचे उपस्थितांना सांगितले . यावेळी सायली भोसले , गुंडगे ( मित्तल अपा. ) हिने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर उत्कृष्ट काव्य करून त्यांचा जीवनपट कथन केला.
- Advertisment -

You cannot copy content of this page