Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडआमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या संकल्पनेतून " १८ ऑगस्ट रोजी नोकरी मेळाव्याचे...

आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या संकल्पनेतून ” १८ ऑगस्ट रोजी नोकरी मेळाव्याचे ” आयोजन !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) नेहमीच आपल्या कर्जत खालापूर मतदार संघात नवनवीन उपक्रम आणून येथील नागरिकांची उन्नत्ती व्हावी , हा उद्दात दृष्टिकोन उराशी बाळगून बहुमूल्य कार्य करणारे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी यावेळी , ” नोकरी तुमच्या दारात ” हि संकल्पना घेवून मतदार संघातील तरुण तरुणींसाठी नोकरीचे आयोजन केले असून हा नोकरी मेळावा ” शिवसेनेच्या माध्यमातून आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या मार्फत रविवार दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी पोसरी – ” शिवतीर्थ ” येथे आयोजित केला आहे . यानिमित्ताने आज पत्रकार परिषदेत या भव्य नोकरी मेळाव्याच्या वेबसाईट व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार महेंद्र शेठ थोरवे व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले . यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या समवेत जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर , विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील , विधानसभा संघटक शिवराम बदे , मा. तालुका प्रमुख बाळाजी विचारे , मा. नगरसेवक ऍड. संकेत भासे , शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , संघटक दिनेश कडू तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी सांगितले की , अडीच वर्षांपूर्वी कोविड चे संकट देशासहित आपल्या मतदार संघात आले , त्यावेळी लॉक डाऊन मुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या , येथे बेरोजगारी वाढली . म्हणून पुन्हा एकदा सर्वांना नोकरी मिळण्यासाठी माझे प्रयत्न असल्याचे त्यांनी जाहीर केले . भव्य दिव्य असा नोकरी मेळाव्याचे नियोजन करण्यात आले असून १० हजार तरुण – तरुणी यांना नोकरी देणार आहोत . यासाठी ५० ते ७० कंपन्या , बँक या मेळाव्यात समाविष्ट होणार आहेत . यासाठी आपला बायोडाटा घेवून या , ५ वी शिक्षण पासून ते पुढील शिक्षण घेतलेल्या सर्वांना नोकरी यात मिळणार असल्याने सर्वांनी फायदा घ्या . येथील बेरोजगारी हटविण्याची संधी सर्वांना उपलब्ध करून देत आहे , कोविड काळात गेलेल्या नोकऱ्या पुन्हा उपलब्ध करून देणार आहोत . यावर त्यांनी प्रकाश टाकला.

यापूर्वीच येथे आपण पर्यटनाला वाव देत आहोत , येथील पर्यटकाला ” अतिथी देवो भव ” असे समजून वागा , त्याप्रमाणे येथील रस्ते व पर्यटनाला साजेसे विकास कामे केली आहेत . ३५०० फार्म हाऊस येथे आहेत , २०१८ ते २०२४ पर्यटनाला ” खो ” घालण्याचा प्रयत्न केला गेला , पण यावर्षी आम्ही केलेल्या मागणीनुसार ” पर्यटन स्थळे ” शासनाने सुरू ठेवली आहेत . कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत , राज्यात पर्यटनावरच आर्थिक उलाढाल होत असते , म्हणून ते आम्ही जपणार असून , ज्या काय समस्या येतील त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत . कर्जत हा ” पर्यटन तालुका ” म्हणून सरकार घोषित करणार असल्याने भविष्यात ” विचार – विकास आणि विश्वास ” या त्रिसुत्रीचा वापर करून मतदार संघाचा विकास साधणार असल्याचे भाकीत त्यांनी सांगितले . दोन्ही तालुक्यातील त्या त्या ठिकाणी तरुणांना नोकऱ्या देणार आहोत , आमदारकीच्या दुसऱ्या टप्प्यात आम्ही ” जनतेचा सेवक ” म्हणून अधिक प्राधान्य देणार आहोत . नोकरी मेळाव्यातून नोकरी तर धंदे व्यवसाय करणाऱ्या तरुणांना कर्ज देण्याचे सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत , असे स्पष्ट करत सर्वांनी १८ ऑगस्ट २०२४ रोजी ” पोसरी शिवतीर्थ ” येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

तर किरण रहाणे – डायरेक्टर यांनी येथील तरुण तरुणी चिकाटीने काम करू शकतात , मेळावा झाल्यावर येथे संपर्क कार्यालय उभे करणार आहोत , आपल्या इथे आलेला तरुण रिकाम्या हाती परत जाणार नाही , याची काळजी घेवून ” जॉब कार्ड ” दिले जाणार आहे , त्यात आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची वेबसाइड ओपन होईल , तो फॉर्म भरून कंपन्या दिल्या जातील त्यात चॉईस करून जाताना जॉब कार्ड घेवून जायचं आहे , ही संकल्पना आमदार साहेबांची असल्याचे त्यांनी सांगितले . दीपक पवार – डायरेक्टर यांनी क्यू आर कोड स्कॅन केल्यावर आमदार साहेबांचे पेज ओपन होईल , त्यात फॉर्म भरायचा आहे , कंपनीचा मेसेज किंवा कॉल येणार असून नामांकित टाटा , महेंद्र त्याचप्रमाणे अनेक कंपन्या यात आहेत , यापुढे सर्व कोर्स देखील शिकवणार आहोत , अशी संकल्पना सांगितली . यावेळी संघटक पंकज पाटील यांनी ” नोकरी मेळावा ” हि खूप चांगली संकल्पना आमदार साहेबांनी मांडली आहे , तरी यांत सर्वांनी फायदा घ्या , असे आवाहन केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page