ठाकरे गट , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , आर पी आय पक्षाला खिंडार !
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आमदार महेंद्र शेठ थोरवे एक ” डॅशिंग ” नेतृत्व , शिवसेना पक्षाची धुरा सांभाळत अनेक संकटे उरावर घेत त्याला ” सामना ” करून पक्ष उभा करणारा ” सेनापती ” . आपल्या संकल्पनेतून कर्जत खालापूर मतदार संघाचा विकास साधत ” विकास गंगा ” खऱ्या अर्थाने पहायला मिळणारी हे त्यांच्या कौशल्याचे देखणे उदाहरण . आपला मतदार संघाचे ” नंदनवन ” करून ” ऐतिहासिक विकास कामे ” घडविली व कर्जत तालुका महाराष्ट्राच्या नकाशावर आणला . हे आजपर्यंत कुठल्याच ” राजकीय भीष्माचार्यला ” रायगडात जमले नाही .
म्हणूनच तर जुने सहकारी आज शिवसेना पक्षात त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश करून आम्हाला विकास कार्याचा सुर गवसला असे सांगत आहेत . आणि हिच आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या ” विजयाची नांदी ” ठरत आहे .आज रविवार दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी ” बाळासाहेब भवन ” येथे शिवसेना उ बा ठा , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , आर पी आय ( आठवले ) पक्षाला जोरदार धक्का देत आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे ” कर्तृत्व ” पुन्हा एकदा ” रोशन ” झाले . पक्ष तोच – जुने सवंगडी पुन्हा एकदा त्यांच्या विकास कार्यावर आकर्षित होत शेकडो च्या संख्येने शिवसेनेत पक्ष प्रवेश शिव बंधन हातात गुंफले.
यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत माजी उपनगराध्यक्ष कर्जत नगरपरिषद श्री.चंद्रकांत उर्फ तात्या जाधव ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) , कर्जत शहर संपर्क प्रमुख (उबाठा गट) संजय मोहीते , शहर समन्वयक (उबाठा गट) सुदेश देवघरे , उपशहरप्रमुख (उबाठा गट) प्रसाद डेरवणकर , नगरसेविका सौ.प्राची डेरवणकर (उबाठा गट), मनोज जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) , राकेश शेट्टी , दिनेश वाघमारे – आर पी आय ( आठवले ) उप शहर अध्यक्ष आदी प्रमुख पदाधिकारी दहिवली , आकूर्ले , गुंडगे , क्रांती नगर भिसेगाव येथून आपल्या असंख्य समर्थकांसह व महिला वर्ग शिवसेनेत दाखल झाले.
याप्रसंगी बोलताना आपण सर्वजण ” हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ” यांच्या विचाराने प्रेरित होऊन आज शिवसेना पक्षात प्रवेश करत आहात , त्याबद्दल मी सर्वप्रथम आपणा सर्वांचे शिवसेना पक्षामध्ये सहर्ष स्वागत करतो. अडीच वर्षापूर्वी सत्तांतर झाले. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर अडीच वर्षातील विकास कामांचा झंजावात संपूर्ण महाराष्ट्राने पहिला आहे व त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कर्जत मतदारसंघाचा आमदार या नात्याने ज्याप्रमाणे मनुष्य जन्म पुन्हा नाही , त्याप्रमाणे मला मिळालेल्या आमदारकीचा ” सोनं ” व या मतदार संघाचे ” नंदनवन ” करण्याचं काम मी सुरू केलं व गेली अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये कर्जत शहरासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले , व विकास घडवला.
राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जतचे नंदनवन करण्याची दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त निधी हा कर्जतच्या विकासासाठी आणण्याचं ठरवलं यामध्ये कर्जतमध्ये असणारी वाढती लोकसंख्या विचारात घेता कर्जत शहराला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते , यासाठी ५७ कोटी रुपयांची ” वॉटर स्कीम ” कर्जत शहरासाठी मंजूर केली व ही संपूर्ण कर्जतकरांसाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे . आज माझे जुने सहकारी पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश करतात , ही माझ्यासाठी खूप आनंदाची व अभिमानाची बाब आहे , व हि आपल्या ” विजयाची नांदी ” आहे , भविष्यात विधान सभेवर व कर्जत न प वर भगवा फडकणारच , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . आपणा सर्वांना शिवसेनेमध्ये योग्य तो मानसन्मान राखला जाईल , आपले सर्व प्रश्न सोडवून सर्व सहकाऱ्यांना विचारात घेऊन आपण एकत्रितपणे पुढील काळात शिवसेनेसाठी कार्य करूयात , असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या समवेत रायगड जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर , उपजिल्हाप्रमुख भाई गायकर , कर्जत ता. प्रमुख संभाजी जगताप , विधानसभा संघटक शिवराम बदे , जिल्हा संघटक अरुण देशमुख , सल्लागार सुनील रसाळ , मा. नगरसेवक बाळाजी विचारे , युवा प्रमुख अमर मिसाळ , जिल्हा सल्लागार सुरेखा शितोळे , शहर संघटीका सायली शहासने , सौ मनिषा भासे , मा. नगरसेवक ऍड. संकेत भासे , शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , शहर संघटक नदीम भाई खान , उपशहर प्रमुख दिनेश कडू , सनी चव्हाण , उपशहर प्रमुख मोहन भोईर , संघटक सचिन खंडागळे , सचिन भोईर तसेच शिवसेना – युवा सेना – महिला आघाडीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिव सैनिक उपस्थित होते.