Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळाआमदार सुनील शेळके यांच्या हस्ते गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार....

आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार….

इयत्ता दहावीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विध्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाला आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती…..

दि. 16, लोणावळ्यातील उद्योजक हनीफ शेख, जिशान शेख, फरहान शेख या शेख परिवाराच्या वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. विध्यार्थ्यांचा सत्कार समारंभ हॉटेल चंद्रलोक येथे संपन्न झाला. त्यावेळी मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी आपली हजेरी लावली त्याच बरोबर लोणावळ्यातील नगरध्यक्षा सुरेखा जाधव,उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, हनीफ शेख, जिशान शेख, फरहान शेख, विलास बडेकर, ब्रिन्दा गणात्रा, दत्तात्रय गवळी, मंजुश्री वाघ, आरोही तळेगावकर, ऍड. अशपाक काझी, इसाक पटेल हाजी ( सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्टी ) यांसमवेत शहरातील अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सईद सर यांनी केले.

त्यावेळी उपस्थितांचे तसेच विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करताना आमदार सुनील शेळके यांनी प्रथम आयोजकांचे आभार व्यक्त करत उद्योजक असून आपण समाजाचे काही तरी देणे लागतो अशा सकारात्मक उद्देशाने लाखो रुपये खर्च करून कोरोना सारख्या महामारीच्या संकटात परिसरातील गोर गरीब, हातावर पोट असलेल्या, गरजू कुटुंबांना दोन वेळचे अन्न उपलब्ध करून घरपोच पोहचविण्याचे जे कार्य शेख परिवार आणि सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्टच्या वतीने करण्यात आले त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो.

त्याच बरोबर दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विध्यार्थ्यांना सन्मान पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना प्रोत्साहनही मिळते परंतु शेख परिवाराकडून गुणवंत विध्यार्थ्यांना सन्मान पत्र, सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविल्यामुळे ही रोख रक्कम त्यांच्या पुढील शिक्षणासाठी उपयोगी ठरेल असे बोलत शेख परिवाराचे कौतुक सुनील शेळके यांनी केले. तसेच विध्यार्थ्यांचे मार्गदर्शन करताना विध्यार्थ्यांनी शिक्षणाविषयी जिद्द बाळगावी, योग्य दिशेने, चांगले विचार करून पुढे चांगल्या प्रतीचे शिक्षण घेण्याची चिकाटी स्वतः मध्ये निर्माण करावी असे मार्गदर्शन केले, आणि हुशार विध्यार्थ्यांना शिक्षणाबाबत कुठलीही अडचण असल्यास आम्हाला हाक द्या आम्ही त्यांच्या सोबत असेल असे आवाहन करण्यात आले.

त्यावेळी पंधरा माध्यमिक विद्यालयातून पहिला व दुसरा क्रमांक मिळविलेल्या तीन विध्यार्थ्यांना आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते गौरविण्यात आले त्यात राजेंद्र गंगाराम मरगळे, फैजा झुलफेकार ( बुट्टो ) बागवान, दिया विनोद नाणेकर, श्रावणी भटू देवरे यांना सन्मान पत्र, सन्मान चिन्ह तसेच 10, 000 / रुपये रोख रक्कम पारितोषिक स्वरूपात देऊन गौरविण्यात आले तर इतर 27 गुणवंत विध्यार्थ्यांना सन्मान पत्र, सन्मान चिन्ह व 5000 / रुपये रोख रक्कम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. फिरोज शेख ,यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

- Advertisment -

You cannot copy content of this page