if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
तो आमचा बॉडीगार्ड नाहीच…
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील नेरळ येथे भर रस्त्यात मारहाण करत असलेली सध्या सोशल मीडिया वर फिरत असलेली व्हिडिओ आणि त्या मागील सत्य आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी सांगितले की , हे आम्हाला बदनाम करण्याचे ठाकरे गटाचे षडयंत्र असून मारणारा तो आमचा ” बॉडीगार्ड ” नाहीच . शिवाजी सोनवणे आणि अमर बांदल यांच्यातील वाद एका मैत्री पूर्व वादातून घडलेला आहे . रस्त्यावरील कुणाचीही भांडणे , मारामारी झाली की , त्याची जोड आमच्या नावाशी लावून आमचे नाव बदनाम करण्याचा कट कारस्थान विरोधकांचे नेहमीच असून ठाकरे गटाने केलेले हे षडयंत्र असल्याचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले .
आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की , अमर आणि शिवाजी हे चांगले मित्र आहेत , ते दोघेही शिवसैनिक आहेत. गेली अनेक वर्ष ते मित्र आहेत. त्यांचे वैयक्तिक वाद झाले , त्या भांडणाशी माझा काय संबंध ? असा त्यांनी सवाल उपस्थित केला
तर मारहाण झालेले अमर बांदल यांनी देखील अशी प्रतिक्रिया दिली की , मारहाण करणारा शिवाजी सोनवणे हा शिवसेना आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा बॉडीगार्ड नाही , आमदार साहेब माझ्या वडिलांच्या जागी असून , मी त्यांना खूप मानतो , आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे , त्यांनी राजकीय पोळी भाजू नये , आमचे वैयक्तिक वादातून भांडण झाले होते, आमदारांचं या प्रकरणात कोणताही हेतू नाही , विरोधक राजकीय पोळी भाजण्याचं काम करत असून ठाकरे गटाने केलेल्या आरोपांचे खंडन करत खुलासा करत आरोप फेटाळले आहेत.