वाकसई (प्रतिनिधी): विजयादशमी निमित्त सालाबादप्रमाणे शिव सेना शाखा वाकसईच्या शिवसेना कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनेचे नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आम्ही कोणत्याही मेळाव्यात गेलो नसलो तरी आम्ही उद्धव साहेबांचेच समर्थक आहोत असे वक्तव्य यावेळी शिवसेना वाकसई शाखेच्या वतीने करण्यात आले.
सालाबादप्रमाणे विजयादशमी निमित्ताने शाखेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाकसई फाटा येथील कार्यालयात मोठया उत्साहाने हा कार्यक्रम साजरा केला जातो परंतु यावेळी कार्यालयाची डागडुजी चालू असल्यामुळे यावेळी फक्त पूजन व पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे.
यावेळी माजी शाखा प्रमुख बाळासाहेब येवले, मावळ पंचायत समिती वाकसई गण विभाग प्रमुख यशवंत येवले,शाखा प्रमुख चंद्रकांत मडके, उप शाखा प्रमुख सुधाकर येवले, देवघर पोलीस पाटील संतोष शिंदे, उद्योजक अनिल खडके आदी मान्यवरांसह शिवसेना व युवा सेनेचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.