if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव-कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यात बरच राजकीय पाणी पुलाखालून गेल्याने , व ज्यांना उभरते केले ते आपलेच सहकारी घड्याळाची वेळ पाहून सोडून गेल्याने , तर अनेकांनी देव पाण्यात ठेवून खरा राजकीय विरोधक कोण , हे दृष्टिहीन झाल्याने , मरगळ आलेल्या कार्यकर्त्यांच्या मनात पुन्हा उभारी आणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांचे हात मजबूत करण्याच्या हेतूने , ” आम्ही साहेबां बरोबरच ” आहोत यासाठी कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट माजी आमदार तथा लोकनेते सुरेशभाऊ लाड पुन्हा एकदा राजकीय मैदानात उतरले असून रविवार दिनांक ६ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे विरोधकांसहित , राष्ट्रवादी काँगेस पक्ष अजित दादा पवार गटाचे देखील लक्ष लागून आहे.
कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक , रविवार दिनांक ६ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ वाजता संकल्प निवास, समर्थ नगर, दहिवली येथे मा. सुरेशभाऊ लाड, माजी आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केली आहे. यावेळी सभेपुढील विषय हे संघटनात्मक बाबीवर विचार विनिमय करून पदाधिकारी नियुक्त्या संदर्भात चर्चा करणे , आयत्यावेळी येणाऱ्या विषयासंदर्भात चर्चा करणे , असे असून या महत्त्वाच्या बैठकीस सर्व सेलचे पदाधिकारी, माथेरान व कर्जत नगर परिषदेचे आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, ग्रामपंचायतचे आजी-माजी सरपंच व सदस्य, सहकारी संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, युवक, महिला, विद्यार्थी, युवती, अल्पसंख्यांक, अनुसूचित जाती – जमाती या सेलच्या सर्व कार्यकर्त्यांनी अवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित रायगड जिल्हा अध्यक्ष तथा राजिपचे माजी अध्यक्ष सुरेशदादा हरिश्चंद्र टोकरे यांनी केले आहे.
कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत , मात्र नेते जरी शरदचंद्र पवार साहेब यांना सोडून गेले असले तरी त्यांना मानणारा कार्यकर्ता हा अजूनही थांबलेला आहे . या मतदार संघात दहिवली सरपंच – कर्जत पंचायत समिती सभापती ते तीन वेळा आमदारकी भूषवून कर्जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करणारे कार्यसम्राट माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांना मानणारा वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे . त्यामुळे आगामी काळात ते पुन्हा एकदा मुसंडी मारून त्यांच्या विरोधकांना व हित चिंतकांना राजकीय आखाड्यात चितपट करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाची वेळ बरोबर करतील , यांत शंकाच नसेल.