Tuesday, July 1, 2025
Homeपुणेलोणावळाआयएनएस शिवाजी व लोणावळा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नेव्ही डे’ साजरा होणार..

आयएनएस शिवाजी व लोणावळा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नेव्ही डे’ साजरा होणार..

प्रतिनिधी: श्रावणी कामत
लोणावळा: आयएनएस शिवाजी आणि लोणावळा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता डॉ. बी. एन. पुरंदरे ग्राऊंड येथे ‘नेव्ही डे’ साजरा करण्यात येणार आहे.
याबाबत माहिती देताना लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. अशोक साबळे म्हणाले, “आर्मी व नेव्ही फोर्समुळे विद्यार्थ्यांना चांगले अधिकारी बनण्याची प्रेरणा मिळते. देशाच्या संरक्षण दलाची शिस्त आणि त्यांचे योगदान पाहून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावनेची रुजवात होते.” या विशेष कार्यक्रमात ‘इंडियन नेव्ही बँड कॉन्सर्ट’ आयोजित करण्यात आली आहे, जिथे संरक्षण दलाच्या कामाची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल. हे क्षेत्र विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी उत्तम संधी उपलब्ध करून देणारे आहे.
कार्यक्रमास आयएनएस शिवाजीचे स्टेशन कमांडर श्री. समीर चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय आर्मी व नेव्हीचे अधिकारीही उपस्थित असतील.
श्री. साबळे यांनी लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने सर्व नागरिक, नगरपरिषद सदस्य, संरक्षण दलाचे माजी अधिकारी, पालक आणि विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “या उपक्रमातून विद्यार्थ्यांना संरक्षण दलाचे महत्त्व समजण्यास मदत होईल. तसेच, हा कार्यक्रम देशभक्ती व राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारा ठरेल,” असेही त्यांनी सांगितले. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन संरक्षण दलाचा सन्मान करावा आणि या प्रेरणादायी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page