Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळाआरपीटीएस खंडाळा येथे NDRF च्या माध्यमातू आपत्ती व्यवस्थापन शिबीर संपन्न…

आरपीटीएस खंडाळा येथे NDRF च्या माध्यमातू आपत्ती व्यवस्थापन शिबीर संपन्न…

लोणावळा (प्रतिनिधी): खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे आपत्ती व्यवस्थापन व “वैद्यकीय प्रतिसाद प्रणाली” मोहिमेचे आयोजन दि.20 रोजी करण्यात आले.
शिक्षक व प्रशिक्षणार्थी यांनी त्यांचे सांघिक कौशल्य वापरुन उपलब्ध साधनसामुग्रीचा प्रभावी वापर कसा करावा तसेच आपत्कालीन परस्थितीत पिडीत लोंकाना तातडीने कशी मदत पुरवावी याबाबतच्या प्रशिक्षणातुन सक्षम जबाबदार भविष्य निर्माण करण्याच्या हेतुने पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळयाचे प्राचार्य एम. एम. मकानदार, उप-प्राचार्य डॉ. अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि.20 रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वा. दरम्यान सर्व प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांच्या करीता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल ( NDRF) बटालिअन 5 मधील कमांडर इन्स्पेक्टर मोहित शर्मा व त्यांचे टिमने पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सर्व आंतरवर्ग व बाहयवर्ग प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी यांचे करीता “वैद्यकीय प्रथम प्रतिसाद प्रणाली”‘ याबाबत व्याख्यान दिले.
यामध्ये आपत्कालीन परस्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना व त्याचे महत्व, पिडीत लोकांना जखमी अवस्थेत प्रथमोपचार कसा करावा, CPR केव्हा आणि कोणत्या परस्थितीत कसा दयावा याबाबत प्रात्यक्षिक करुन दाखविले व त्याचा सराव प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक यांचेकडुन करवुन घेतला.
सदर प्रशिक्षणाचे आयोजन पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळयाचे प्राचार्य एम.एम. मकानदार, उप-प्राचार्य डॉ. अभिजीत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयश्री चिवडशेट्टी व पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांनी केले. सदर व्याख्यानास प्रभारी उप प्राचार्य प्रकाश वाडकर, प्रशिक्षण सत्र समन्वय अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेखा घार्गे, वैदयकीय अधिकारी श्रीमती भायेकर, पो. निरीक्षक दुर्गेश शेलार, पो. निरीक्षक निता मिसाळ, पो. निरीक्षक नंदकुमार मोरे, राखीव पो. निरीक्षक कोळी यांचेसह इतर आंतरवर्ग व बाहयवर्ग स्टाफ हजर होता.
- Advertisment -

You cannot copy content of this page