Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडआर पी आय ( आठवले ) पक्षाच्या महाराष्ट्र युवक आघाडी संघटक पदी...

आर पी आय ( आठवले ) पक्षाच्या महाराष्ट्र युवक आघाडी संघटक पदी ऍड. उत्तम गायकवाड यांची नियुक्ती !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) रिपब्लिसकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) पक्षात नेहमीच मोर्चे – आंदोलने – सामाजिक समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर रहाणारे व गेली ” २५ वर्षे एक नेता – एक पक्ष ” म्हणून प्रामाणिकपणे कार्य करणारे आर पी आय पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते ऍड . उत्तम जानू गायकवाड यांची त्यांचे धडाडीचे कार्य बघुन पक्षाच्या ” महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडीच्या संघटक पदी ” निवड करण्यात आली आहे . त्यामुळे पक्षात तसेच त्यांच्या कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे , यानिमित्ताने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
यापूर्वी ऍड. उत्तम गायकवाड यांनी विभागीय अध्यक्ष , तालुका युवक अध्यक्ष व सध्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून पदे सांभाळली आहेत तर ते ऑल इंडिया पोलीस सुरक्षा परिषदेचे कायदेशीर सल्लागार व कर्जत लाईव्ह या चॅनलचे देखील ” कायदेशीर सल्लागार ” म्हणून काम पाहत आहेत. मागील २५ वर्षांपासून ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षात धडाडीने कार्यरत असून पेशाने वकील असून समाजाचे विविध प्रश्न वकीलीच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळले आहेत.

ऍड. उत्तम गायकवाड यांना महाराष्ट्र युवक आघाडीच्या संघटक पदावर नियुक्ती झाल्याने कोकणात व रायगड जिल्ह्यात तसेच कर्जत तालुक्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी मजबूत करून पक्षाला सर्व क्षेत्रात यश संपादन करून देईन , असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडी संघटक पदी ॲड.उत्तम गायकवाड यांची आज नवी मुंबई येथे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार यांच्या आदेशाने निवड करण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे साहेब, राज्य सरचिटणीस राज्य सरचिटणीस डॉ. विजय मोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. सदर कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सर्व युवक अध्यक्ष, राज्य कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page