![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
” राजकीय आणि सामाजिक कार्याचं उत्तुंग शिखर “
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) समाज कार्याची आवड असणारा व्यक्ती आपली ” चुणूक ” कार्यातून दाखवीत असतो , आपल्या प्रभागातील नागरिकांची ” समस्याग्रस्त ” कामे करत शहारा बरोबरच तालुका व जिल्ह्यात आपल्या सामाजिक कार्याची तळमळ दाखवित ” गरुड झेप ” घेणारे कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली प्रभागातील सुनिल भाऊ सोनावणे म्हणजे ” राजकीय आणि सामाजिक कार्याचं उत्तुंग शिखर ” म्हणाव लागेल.
बहुजन समाज व बौद्ध बांधवांवर या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात न दिसणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात ” दंड थोपटले ” पाहिजे म्हणून ” विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांचे ” १०० वर्षे शेळी होवून जगण्यापेक्षा १ दिवस वाघ बनून जगा ” हा बहुमूल्य विचार आत्मसात करून लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असताना समाजाच्या हितासाठी राजकारणात येऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा ” मान. रामदासजी आठवले साहेब ” यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ” राजकीय हुंकार ” दिला . त्यांची काम करण्याची आक्रमकता व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची पद्धत यामुळे त्यांना कर्जत शहराचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे ” सचिव ” पद आठवले साहेबांच्या आशीर्वादाने व स्थानिक पदाधिकारी यांच्या प्रयत्नाने मिळाले . त्यामुळे सुनिल भाऊंच काम अधिक ” गतिशील ” झालं . ज्या ज्या नागरिकांवर अन्याय अत्याचार होत होते त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला , मग तो अन्याय सामाजिक असो , राजकीय असो की , धार्मिक , शैक्षणिक , सांस्कृतिक असो , या संबंधी प्रसंगी मोर्चा असेल , आंदोलन असेल , उपोषण असतील , की धरणे आंदोलन असेल , अशा अनेक प्रकारच्या आंदोलनात सुनील भाऊ सोनावणे अग्रेसर राहून त्यांनी यश संपादन केले.
आपल्या दहिवली प्रभागातील महिलांचा शौचालयाचा प्रश्न अनेक वर्ष सुटत नव्हता , पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक वर्ष कुणी लक्ष देत नव्हते , रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर होता यावर त्यांनी प्रशासनाच्या विरोधात ” दंड थोपटून ” आमरण उपोषण करून तो प्रश्न कर्जत पालिका प्रशासनास ” नामोहरम ” करत सोडवून तडीस नेले . यांत त्यांना त्यांच्या प्रभागातील नागरिकांचे व डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर दहिवली येथील बंधू भगिनींचे मोलाचे सहकार्य लाभले . महापुरुषांच्या जयंती उत्सव , भारतीय संविधान स्तंभ , डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन , हे होण्यासाठी त्यांची परिपूर्ण नेहमीच साथ होती . कोरोना काळात त्यांची गरजवंतांना मोलाची मदत होती.
या दरम्यान त्यांचे कार्य ” उत्तुंग भरारी ” घेत तालुका भर पसरले याची दखल पक्ष श्रेष्ठी व आर पी आय रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र भाई गायकवाड यांनी घेत सुनिल भाऊंना रायगड जिल्ह्याचे महासचिव पद दिले . यानंतरही कर्जत खालापूर तालुक्यासह रायगड जिल्ह्यात त्यांचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने ” ठसठशीत ” दिसले . यामुळे आर पी आय पक्ष रायगड मध्ये सर्वत्र पसरून मान. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासही आठवले साहेब यांचे हात ” मजबूत ” झाले.
त्यांच्या यशस्वी कार्यामुळेच मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे खासदार ” श्रीरंग आप्पा बारणे ” हे मोठ्या मताधिक्याने व कर्जत खालापूर मतदार संघाचे ” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांनी ” विजयी घौडदौड ” करत यश संपादन केले , यांत जिल्हा महासचिव सुनिल भाऊ सोनावणे यांचा ” खारीचा वाटा ” आहे . नागरिकांची कामे सहजरित्या ते करत असल्याने नागरिकांच्या मनातला आपला ” हक्काचा माणूस ” म्हणून कर्जत शहरांत आणि तालुक्यामध्ये त्यांची ओळख असून शासकीय दरबारी त्यांचा ” जिव्हाळ्याचा दरारा ” असल्याने त्यांच्याकडे आलेला समस्याग्रस्त गरजू नागरिक काम ” फत्ते ” होऊनच परत जात असल्याचे , चित्र सर्वत्र दिसत आहे.
आर पी आय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान. केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली व पक्ष श्रेष्ठी कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुलजी डाळींबकर , प्रभारी कर्जत तालुका अध्यक्ष मनोज भाई गायकवाड , कर्जत शहर अध्यक्ष अरविंद मोरे यांच्या सहकार्याने त्यांचे असंख्य पदाधिकारी , कार्यकर्ते , त्यांची सावली सारखी साथ देणारी त्यांची पत्नी , कुटुंबातील सदस्य , मित्र परिवार यांच्या साथीने सुनिल भाऊ सोनावणे यांचे कार्य आजमितीस परिपूर्ण असून त्यास ” सुवर्ण झालर ” लागून सर्वत्र ” लखलखत ” असून ” लोकप्रतिनिधीस ” लाजवेल असे त्यांचे कार्य ” फिनिक्स ” पक्षाप्रमाणे ” गरुड भरारी ” घेऊन राजकीय क्षितिजावर ” तेजोमय ” होत राहो , अशीच मंगलमय कामना त्यांच्या २८ जुलै २०२५ या शुभ वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना करून शुभेच्छा रुपी त्यांना देत राहू . दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील त्यांचा वाढदिवस ” सामाजिक कार्यातून ” साजरा होणार आहे.