” कर्जत पोस्ट मास्तरांची दबंगगिरी “मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी समज देऊनही माजोरीपणा,…गुन्हा नोंद करण्याची वृक्ष प्रेमी अमित गुप्ता यांची मागणी…
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत बाजारपेठेत असलेले पोस्ट ऑफिस सध्या ” भारीच चर्चेत ” आले आले आहे . या कार्यालयाचे पोस्ट मास्तर आपल्या अधिकाराचा गैरवापर करून ” दबंग गिरी ” करत असल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे . या आवारातील अनेक वर्षांची जुनी झाडे त्रासदायक ठरणाऱ्या फक्त फांद्या तोडण्याचे पत्र कर्जत न. प. ने दिले असताना मात्र पोस्ट मास्तर अमर सागले आपल्याच ” मर्जीने ” खोडापर्यंत झाडे तोडत असल्याने याविरोधात वृक्ष प्रेमी संतप्त झाले असून त्यांनी तशी पालिकेला तक्रार गुरुवार दिनांक २९ मे २०२५ रोजी केली असता मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी पोस्ट मास्तर अमर सागले यांना कार्यालयात बोलावून समज दिली होती.
मात्र दबंग गिरीचा शोक असलेले हे महाशय अमर सागले यांनी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पुन्हा काम सुरू करून मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्या दिलेल्या समज ला फाट्यावर मारून मी काम माझ्या मर्जीने करणार , अश्या आवेशात वृक्ष तोड शासनाचे नियम तोडून बेकायदेशीर करत असल्याचे वृक्ष प्रेमी अमित गुप्ता , विकास चित्ते , भावेश ठक्कर यांनी मुख्याधिकारी यांना सांगितले आहे.
याबाबतीत माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी झाडे खोडापासून तोडा असा आदेश मला दिला असून ते तोडण्याचे एस्टिमेंट बनवले आहे . म्हणूनच मुळासकट झाडे तोडण्याचा उद्देश पोस्ट मास्तर अमर सागले यांचा होता , मात्र शेजारीच रहाणारे वृक्ष प्रेमी अमित गुप्ता यांनी कर्जत न.प. तक्रार केली असता नगरपरीषदेने फक्त वाढलेल्या फांद्या तोडायला परवानगी दिली आहे , असे निदर्शनास आले . दरम्यान मुख्याधिकारी यांनी वेळीच दखल घेऊन कर्मचारी निकेश फाळे यांना सदर ठिकाणी पाठवल्याने पोस्टमास्तर यांचा झाडे मुळापासून तोडण्याचा प्लान फसला होता , मात्र आज पुन्हा झाडे मुळापासून तोडण्याच्या पोस्ट मास्तरांच्या ” प्रतापामुळे ” वृक्ष प्रेमी संतापले असून पोस्ट मास्तर अमर सागले यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करणार असल्याचे मत वृक्ष प्रेमी अमित गुप्ता यांनी व्यक्त केले आहे . यावर कर्जत न. प. चे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण त्यांचे लेखी पत्र न जुमानणाऱ्या पोस्ट मास्तर अमर सागले यांच्या वर काय कारवाई करतात ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.