Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडआषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी घडविले " मराठमोळ्या संस्कृतीचे " दर्शन…

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी घडविले ” मराठमोळ्या संस्कृतीचे ” दर्शन…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुका हा वारकरी सांप्रदाय पंथाचा तालुका आहे . शालेय दशकातूनच घडणारे विद्यार्थी हे भक्ती पंथाला मानणारे असल्याने येथे ” देवशयनी आषाढी एकादशीचे ” औचित्य साधून कर्जत येथील के.ई.एस. इंग्लिश मिडीयम शाळेतील इयत्ता ७ वी , ८ वी व ९ वीच्या विद्यार्थ्यांनी संत परंपरेच प्रात्यक्षिक दर्शवत , ढोल ताश्याच्या गजरात , विठोबाच्या नामस्मरणात , पायी दिंडी काढली. या दिंडीत शाळेतील इयत्ता ७ वी ते ९ वीचे ३०० विद्यार्थी तसेच , संस्थेचे संस्थापक , शाळेच्या मुख्याध्यापिका , शाळेचे शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी असे एकूण ३७० लोक सहभागी झाले होते. या त्यांच्या भक्तिमय उपक्रमाने अख्खे कर्जत च्या नागरिकांचे पारणे फिटले असून सर्वांनी के.ई.एस. कर्जत इंग्लिश मिडीयम स्कूलचे कौतुक केले आहे.

यावेळी के.ई.एस.कर्जत शाळेत श्री विठ्ठल – रखुमाईच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडल्यानंतर आमराई रोड कर्जत येथून या दिंडीला सुरुवात झाली . पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – कर्जत न. प. कार्यालयाच्या समोरून – कन्या शाळा – अभिनव शाळा असे मार्गक्रमण करीत श्रीराम पुलावरील ” प्रति पंढरपूर ” येथील विठूरायासमोर पोहचली. या प्रती पंढरपूर येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य, विठ्ठलाचा गजर , विठ्ठलाचे अभंग अशा अनेकविध गाण्यांवर वेगवेगळे कार्यक्रम सादर केले . ” अवघी अवतरली पंढरी ” या उक्तीचा साक्षात्कार येथे झाला . या दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी जे वेगवेगळे कार्यक्रम सादर केले ते पाहून जणू श्री हरी विठ्ठलाचे पंढरपूरच कर्जतमध्ये अवतरले आहे असे वाटले.

यावेळी श्री विठ्ठलाच्या दर्शनाला आलेल्या हजारो भाविकांनी हे भक्तिमय नृत्य व कार्यक्रम बघुन मंत्रमुग्ध झाले , तर कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी देखील कौतुक केले.या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन डॉ. अनिरुद्ध जोशी , सेक्रेटरी प्रवीण गांगल , सदस्य मनोरे सर , खजिनदार परमार सर , सदस्य पिंपरे सर , राजेश भुतकर सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुपमा चौधरी , माध्यमिक विभागाचे विभागप्रमुख सुनील बोरसे , प्राथमिक विभागाच्या विभागप्रमुख संपदा भोगले यांचे मोलाचं मार्गदर्शन व सहकार्य लाभले. अशा प्रकारे अतिशय आनंदात, उत्साहात , के. ई. एस. कर्जत शाळेचा हा ” भक्तिमय उपक्रम ” विठुरायाच्या गजरात व नामस्मरणात दिंडी सोहळा पार पडला.

- Advertisment -

You cannot copy content of this page