सातारा : सातारा येथील पूरग्रस्त गावांना इंडियन स्काऊट गाईड फेलोशिप महाराष्ट्र स्टेट धावून आली व त्यांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सातारा येथील मळे, कोळणे, पाथरपून्ज या पूरग्रस्त गावानंतील प्रेत्येक कुटुंबांना ( तांदूळ, तूरडाळ, साखर,चहापावडर, पोहे, रवा, तेल, साबण तीन प्रकारचे, मीठ, मसाले व बिस्कीट )आणि शाळेत वापरण्यासाठी आकर्षित स्कूल बॅग यासारखी मदत करण्यात आली.
या कार्यासाठी इंडियन स्काऊट गाईड फेलोशिप महाराष्ट्र स्टेटचे अध्यक्ष विष्णू अग्रवाल, राज्य सचिव डॉ अमोल कालेकर, लोणावळा गिल्ड चे अध्यक्ष डॉ.अशोक घाडगे, उपाध्यक्ष रत्नप्रभा गायकवाड, सचिव सुनिल शिंदे, खजिनदार सुरेश गायकवाड, पत्रकार श्रावणी कामत, शशिकांत भोसले, आशिष जंlगीर, नंदिका कामत, फलटण गिल्ड च्या अध्यक्षा वासंती जाधव, पत्रकार विद्या मसुरणेकर, सातारा भारत स्काऊट गाईड चे सुरेश चव्हाण, उमेश मिसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यादरम्यान 200 कुटुंबासाठी 15 दिवसाचं राशन किट प्रत्येक कुटूंबातील सदस्यांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.
यावेळी सर्व पूरग्रस्थ्यांचे अश्रू अनावर झाले होते.मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान व हानी झाली असे गावकरी गाराने गात होते. पत्रकार विद्या ह्यांनी आमचे हाल तुमच्या पर्यंत पोहचवलेत असे कौतुकास्पद उच्चार करत त्यांचे व इंडियन स्काऊट गाईड फेलोशिप महाराष्ट्र स्टेटचे गावकऱ्यांनी आभार मानले.