if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
तळेगाव (प्रतिनिधी):इंदोरी पुलाजवळ आज एक मुलगी पाण्यात बुडाली होती. तीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आपदा मित्र व वन्य जीव रक्षक मावळ संस्थेच्या शोध पथकांना यश आले आहे.
प्रज्ञा कौशल भोसले (वय 23, रा.वराळे तळेगाव मावळ) असे या तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार प्रज्ञा हि खूप शिकलेली होती. मागील दिड महिन्यापूर्वी नाणोली येथे तिचा विवाह झाला होता.प्रज्ञाचे वडील हे पुर्ण अपगं होते व त्यांचे निधन झाल्यानंतर तीची अपंग आई हे इंदोरी येथे भाजी विकुण आपला उदरनिर्वाह करत होते.तिच्या पाण्यात बुडाल्याच्या बातमीने संपूर्ण मावळात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून इंदोरी पोलीस पुढील तपास करत आहेत.
इंदोरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सोरटे, अनिल पवार, सुरेश भोजने, मल्हारी धनवटे यांच्या मार्गदर्शनाने मावळ वन्यजीव रक्षक टीम व आपदा मित्र मावळ यांच्या रेस्कू टीमचे निलेश गराडे, निनाद काकडे, सुरज शिंदे, भास्कर माळी,अवि कारले, रोहित दाभाडे, गणेश गायकवाड, सुरज गोबी, विनय सावंत, शुभम काकडे, राजू सय्यद आदींनी हे रेस्क्यू पार पाडले.