Wednesday, December 4, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडइमारत बांधण्यास अडसर ठरणाऱ्या जांभूळ झाडाची बिल्डरने केली कत्तल !

इमारत बांधण्यास अडसर ठरणाऱ्या जांभूळ झाडाची बिल्डरने केली कत्तल !

जमीन मालक व बिल्डरवर वनविभागाने कारवाई करण्याची संघटनेची मागणी…

भिसेगाव -कर्जत ( सुभाष सोनावणे ) झाडे लावा – झाडे जगवा व पर्यावरण पूरक वातावरणात जगा , असा शासनाचा नियम असताना कर्जत नगर परिषद हद्दीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकापासून नदी घाट – महावीर पेठ कडे जाणाऱ्या रस्त्यावर हर्ता को ऑफ हौसिंग सोसायटी व रखुमाई दर्शन इमारतीच्या मधल्या भागात जागा भुईसपाट करून बिल्डरने इमारत बांधकामास मध्येच अडसर ठरणाऱ्या एका भल्या मोठ्या जांभूळ झाडाची कत्तल खुलेआम केली असल्याने या बेकायदेशीर कृत्याबद्दल जमीन मालक व बिल्डरवर वनविभागाने कारवाई करण्याची मागणी छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेने केली आहे.कर्जत नगर परिषद हद्दीत नदी घाट कडे जाणाऱ्या रस्त्यावर रखुमाई दर्शन इमारतीच्या शेजारी प्रशस्त जागा भुईसपाट करून त्यावर टोलेजंग इमारत बांधण्याचे काम बिल्डर करत आहे.
या जागेवर मध्यभागीच जांभूळ जातीचे भलेमोठे झाड इमारत बांधण्यास अडसर ठरत होते , म्हणून बिल्डरने हे झाड बेकायदेशीरपणे तोडून झाडाची कत्तल केली आहे . जांभूळ हे वनौषधी झाड आहे . त्याचे फळ , पाने , साल , याचे आयुर्वेदात अनन्य साधारण महत्व असताना बिल्डरने येथील भले मोठे झाड बेकायदेशीर जमीनदोस्त करून कत्तल केली आहे.
वनविभाग असे महत्वपूर्ण झाड तोडण्यास कधीच परवानगी देत नसल्याने असे बेकायदेशीर कृत्य बिल्डरने केल्याने वनविभागाने तेथील जागेचे मालक व बिल्डरवर कडक कारवाई करण्याची मागणी छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेने केली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page