Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडइर्षाळवाडी येथील बचावकार्य थांबविण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश…

इर्षाळवाडी येथील बचावकार्य थांबविण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश…

रायगड (प्रतिनिधी):इर्शाळवाडी दुर्घटनेतील बचावकार्य थांबाविण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. या दुर्घटनेत मातीच्या ढीगाऱ्याखाली अडकलेल्या 144 जणांना वाचविण्यात रेस्क्यू पथकांना यश आले असून यामध्ये 27 जण मृत्यू झाले असून 57 जण बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
इर्शाळवाडी येथील बचाव कार्याचा आढावा व पाहणी संदर्भात खालापूर पोलीस स्टेशन येथे आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी बोलताना “बचावलेल्या 144 लोकांच्या पाठिशी शासन ताकदीने उभे आहे. या लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. याबरोबरच जिल्हातील अन्य धोकादायक वाड्या आणि गावांचे पुनर्वसन करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.तसेच 19 जुलै पासुन सुरु असलेली बचाव कार्य मोहीम 23 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता थांबविण्यात आली.
यावेळी आमदार महेश बालदी, महेंद्र थोरवे, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, विशेष पोलीस निरीक्षक प्रविण पवार, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बढे, एनडीआरएफ कंमाडर श्री.तिवारी उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, 19 जुलै रोजी इर्शाळवाडी या ठिकाणी दरड कोसळल्याने या आदिवासीवाडीतील 43 घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली असून इर्शाळवाडीतील 228 इतकी लोकसंख्या होती. यापैकी या दुर्घटनेत 27 लोक मृत्यूमुखी, 57 लोक बेपत्ता असून 144 लोक हयात आहेत. या हयात असलेल्या लोकांचे तात्पुरत्या जागेत पुनर्वसन करण्यात आले आहे. तसेच त्यांना लागणाऱ्या सर्व सोयी- सुविधा शासनाकडून पुरविण्यात आल्या आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page