Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडईतर महिलांशी तुलना करणे टाळा , अन्यथा मानसिक आजाराला आमंत्रण - समुपदेशक...

ईतर महिलांशी तुलना करणे टाळा , अन्यथा मानसिक आजाराला आमंत्रण – समुपदेशक देवश्री जोशी..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आजकाल कुटुंबात ” सुपर मॉम – सुपर वूमन ” हा प्रकार सातत्याने दिसत आहे , इतर महिलांशी आपली केलेल्या तुलनेतून अनेक मानसिक आजारांना आपण आमंत्रण देत असतो , म्हणूनच हि तुलना करणे टाळा , असे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मनःस्वास्थ्य क्लिनिक कर्जतच्या समुपदेशक देवश्री जोशी यांनी व्यक्त केले आहे . नक्की काय आहे हे ” सुपर मॉम – सुपर वूमन ” तर हा आजूबाजूला सतत इतर महिलांसोबत केलेल्या तुलना मुळे किंवा स्वतःकडून अतिरिक्त अपेक्षा केल्यामुळे झालेला ” आजार ” आहे . हो हा आजार चं आहे , आणि हा प्रत्येकाला झाला आहे . त्यामुळे स्वतःवर नाखुष असणं, स्वतःवर doubt घेणं , चिडचिड होणं , किंवा मी कशी चांगलीच नाही , ह्या गोष्टी खूप आजूबाजूला वाढताना बघतं आहोत.

याबद्दल संक्षिप्त स्वरूपात समुपदेशक देवश्री जोशी सांगतात की , ” सुपर मॉम – सुपर वुमन ” म्हणजे नक्की काय ? मी खूप जणींना हा प्रश्न विचारला आहे ? उत्तर काय तर मॅडम ती घर सांभाळते , ऑफिस ला जाते , मुलं सांभाळते , नातेवाईक सांभाळते , आल्या – गेल्याचं पै पाहुणे बघते , सगळंच करते , मला नाही जमत मला कधी जमणार ? तुम्हाला समोरच्या महिला विषयी नक्की काय माहिती आहे ? आम्ही तिला हे करताना बघतो , म्हणून ती छान तुम्ही वाईट किंवा कमी का ? तर असं अगदीच नाही , आम्हाला पण जमलंच पाहिजेल . कशाला ? तिला हे करत असताना कोणाचा तरी मदतीचा हात असू शकतो , घरकामाला बाई असू शकते , तिची मुलं मोठी होऊन त्यांचं त्यांचं ते करू शकत असतील , आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहे तर फरक राहणारच . कोण काय करतंय ? कोणाला काय जमतंय ? हे बघण्यापेक्षा मला काय जमतंय , मी भावनिक दृष्ट्या कशी सक्षम राहीन , हे सर्वात महत्वाचं आहे . ” सुपर मॉम किंवा सुपर वूमन ” हे वाईट आहे का किंवा ह्यात गैर ते काय ? ह्या अतिरिक्त अपेक्षांमुळे आपण स्वतःपासूनच दुरावत चाललो आहोत , जर मी स्वतालाच गुणदोषा सकट accept चं केलं नाही तर आजूबाजूचे का करतील ? सगळ्यांच्याच मनासारखं मी वागल्यानंतर मला जर कोणी छान म्हणत असेल किंवा माझ्या कामाची मला पावती मिळत असेल तर ह्याचा काय फायदा आहे ? कारण समोरच्या मनासारखं वागल्यानंतर कोणी पण छानच म्हणणार आहे मला, मग घरचे असुदे किंवा बाहेरचे किंवा ऑफिस मधले , मग ह्याचा अर्थ असा आहे का मी फक्त माझंच चालवायचं , समोरच्याचा विचार न करता , तर अजिबात असं पण नाही पण जर का सतत आपण समोरच्याच मनासारखं वागत राहिलो तर समोरचा पण विसरून जाईल , अरे समोरच्या आपल्या आईला , बहिणीला , बायकोला , मैत्रिणीला ऑफिस मधल्या सोबतच्या बाईला त्यांचं पण मत आहे , किंवा आपण ते जाणून तरी घेतलं पाहिजेल. आणि जरी कोणीच आपल्याला समजून नाही घेतलं तरी आपल्याला समोरच्या पर्यंत पोचता आलं पाहिजेल ,सांगता आलं पाहिजेल , मला काय वाटतं आहे / मला काय पाहिजे आयुष्यामध्ये , यावर त्यांनी प्रकाश टाकला .

खूप महिला जेव्हा माझ्याशी बोलतात त्यांच्यातलं एक प्रातिनिधिक उदाहरण आहे, खूप महिलांना सवय असते की , रात्री जेवताना घरात ताज / फ्रेश गरम गरम अन्नच देणं , हे वाईट आहे का तर नाही , पण हे तुम्हाला रोज जमत असेल तर चांगलच आहे , पण काय करणार आजकाल मला पण येतो कि कंटाळा , पण आता आमच्या घरच्यांना खूप सवय झाली आहे , आता ते काही ऍडजस्ट करू शकत नाही . असं का झालं तर आपण सवय लावलीच नसती तर , घरातल्या आईला, बायकोला किंवा बहिणीला कंटाळा येऊ शकतो , तिला पण रोज तेच तेच करून नको होत असेल. जेव्हा मी त्यांना सांगते तुमच्या घरातली लोकं ही तुमचीच आहेत , नक्कीच तुम्हाला समजून घेतील , एकदा बोलून तर बघा . समोरची व्यक्ती माझ्याकडे अशा नजरेने बघते खाऊ की गिळू , पण ह्या सगळ्यातून मार्ग फक्त तुम्ही आणि तुम्हीच काढू शकणार आहात . आपण काही वेगळ्या पर्यांयाचा विचार करू शकतो का ? जेव्हा मी अस विचारते तेव्हा उत्तर नाही येतं , म्हणजे तुम्हाला बदल पण करायचा आहे , पण घरातल्याना विचारात घेऊन पण काही सांगायचं नाही , तर असं होत नाही , काय पर्याय निघू शकतात याचां खुलासा करताना जोशी सांगतात १ ) मला रात्री पोळ्या करायचा खूप कंटाळा येतो अगदी थकायला होतं , काही हरकत नाही एकतर सकाळीच पोळ्या करा , मॅडम , सकाळच्याच पोळ्या रात्री कशा खाणार ? का नाही खाऊ शकत , तुम्ही गरम करून द्या , २ ) फक्त पोळ्यांना बाई लावा तुम्हाला पण थोडा आराम हे असं सांगितलं कोणाला , की समोरच्याला असं वाटतं आपण किती आपल्या कुटुंबावर अन्याय करत आहोत.
का अन्याय ? तुम्हाला पण मन – शरीर आहे की , कंटाळा ह्या गोष्टी येऊ शकत नाही का ? की दिवसभर तुम्ही घरची कामं करणं, बाहेरची पण करणं , सगळ्यांच्या मनाप्रमाणे तुम्हीच वागणं , ह्याचा ” मक्ता ” मीच घेतला आहे का ? जर हे उदाहरण बघितलं तर खूप साधं आहे पण खूप काही सांगणार आहे , जर का आपणच आपल्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही , स्वतःकडे , स्वतःच्या शरीराकडे , ह्या सगळ्याचा काय उपयोग आहे ? मी सतत कोणाला ना कोणाला कामासाठी उपलब्ध असणंच खूप जणींना सुखावह असतं का ? पण आपला वापर हा फक्त समोरच्या कामासाठीच असला पाहिजे का ? का आपण आपली तुलना सतत आजूबाजूच्या स्त्रीयांसोबत करतो , नक्कीच एखादी चांगली गोष्ट घ्या , शिका पण म्हणून अट्टाहास नको , तिला जमत तर मला का नाही ? ह्यामुळे आपण आपले मौल्यवान क्षण घालवतो आहोत का ? ह्या ” सुपर मॉम आणि सुपर वूमन ” च्या चक्रव्हुयात अडकून ? मला माझ्या घरच्यांसोबत नातं सुदृढ हवंय की फक्त कामापुरतंच हवंय , मी कामं केली तरच समोरच्याला हवी हवीशी वाटते का ? हे प्रश्न स्वतःला विचारा. आणि ह्या सगळ्याच उत्तर ” हो ” आलं , तर स्वतःला समजून घ्यायची स्वतःला वेळ द्यायची गरज आलेली आहे.
ही स्पर्धा आयुष्यभर असणारच आहे , पण ती आपण कोणाशी करतो आहोत , हे खूप महत्वाचं आहे , सगळ्या गोष्टी करून मी माझा आनंद हाच आहे किंवा माझं आयुष्य असंच आहे , असा विचार केला तर ह्यातून बाहेर पडता येणार नाही , आणि ह्यामध्ये फक्त ” ताण तणाव ” वाढतंच जाणार आहे . मी पण एक माणूस आहे माझ्यात पण काही सामर्थ्य आहे काही दुर्बलता आहे , हे मान्य केलं तर ” सुपर मॉम – सुपर वूमन ” पेक्षा ” बाई पणाचा ” प्रवास ” सुलभ आणि आत्मिक शांतीचा ” नक्कीच असेल. जिथे बाई म्हणून जन्माला आलो आहोत तिकडेच आपला प्रवास ” सुपर ” झाला आहे , अजून वेगळं ” सुपर ” होण्याची गरज नाही . फक्त ” बाईपणाच देणं ” समृध्द करूयात . ह्या प्रवासात तुम्हाला माझ्याशी बोलावसं वाटलं तर मी आहेच . आताच मनःस्वास्थ्य क्लिनिक – कर्जत समुपदेशक देवश्री जोशी – ९५२७६७६००८ यावर संपर्क करा , असे मत त्यांनी व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page