Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडईद ए मिलाद निमित्ताने कर्जतमध्ये रक्तदान शिबिर !

ईद ए मिलाद निमित्ताने कर्जतमध्ये रक्तदान शिबिर !

मुस्लिम सुन्नी जामा मस्जिद ट्रस्ट तर्फे मानवतावादी – सामाजिक – राष्ट्रीय कार्य..

भिसेगाव- कर्जत( सुभाष सोनावणे )कर्जत नगर परिषद हद्दीत मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद ए मिलाद निमित्ताने मुस्लिम समाजातर्फे देशव्यापी – मानवतावादी – सामाजिक व राष्ट्रीय कार्य करण्याच्या हेतूने मुस्लिम सुन्नी जामा मस्जित येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अनेकांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभागी झाले.कर्जतचे सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या रक्तदान शिबिरात रक्तदान शिबिर ईद – ए – मिलाद निमित्त मुस्लिम समाज कर्जत तर्फे मुस्लिम जामा मस्जिद कर्जत येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कर्जत खालापूर तालुक्यातील ४६० वे या रक्तदान शिबिरात एकूण १२१ रक्तदात्यांनी रक्तदान केले . मुस्लिम समाजातील या रक्तदान शिबिरात सय्यद मुश्ताक ईद्रूस यांनी सर्व प्रथम रक्तदान केले.या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत , भाजपचे नेते सुनील गोगटे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक बैजू घुमरे, शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, रंजन दातार,ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे,काँग्रेसचे मुकेश सुर्वे,दिनेश कडू , तालुका संघटक बाबु घारे, तालुका प्रमुख उत्तम दादा कोळंबे ,चेतन शाह,इलियास कर्जतवाला, कोंढाणा टाइम्सचे रमाकांत जाधव,अनिल शाह,मोहनशेठ ओसवाल,जयवंत म्हसे,विनोद पांडे,कृष्णा जाधव,सुरेश सुर्वे,महेंद्र कांबळे, रोनक कोठारी, प्रशांत उगले,कर्जत पोलिस ठाण्याचे श्री देशमुख, व इतर पोलिस कर्मचारी , इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष सैदु शेख यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

या प्रसंगी रक्तसंकलानाचे काम घाटकोपर येथील समर्पण रक्तपेढीचे डॉ. अक्लाख शेख व त्यांची सर्व टीम यांनी उत्तम प्रकारे केले . या रक्तदान शिबिरात मुस्लिम समाजाचे सैदू शेख,नदीम खान,रशीद मुजावर,इस्माईल दिवान, नदीम कुरेशी,इम्रान मुल्ला, टोनी खान , शबाब टिवाले,रियाज मुजावर,शकील शेख,आरिफ चौगुले,राहील शेख,नवाज तांबोली,अमीर मणियार,हमीद खैराट,रमिज बिद्री, जहुर शेख,इम्रान अनवर,अजीज शेख, एजाज मुल्ला, सरताज खान, वहाब मुजावर,सलीम शेख,हैदर शेख,युसुफ खान ,लाला चौगुले , रौनक कोठारी व इतर अनेक उपस्थित राहून सहकार्य केले.

हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सर्व सभासद, व सर्व मुस्लिम बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.या प्रसंगी उपस्थित सर्व रक्तदाते, सर्व मान्यवर, समर्पण ब्लड बँकची सर्व टीम, कर्जत मुस्लिम समाजाचे सर्व बांधव,पोलिस कर्मचारी इत्यादींचे नदीम खान यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page