Friday, August 8, 2025
Homeमहाराष्ट्ररायगड" उत्सवाची पर्वणी - आनंदाला गवसणी , महिला भगिनींसाठी आली श्रावण सरी...

” उत्सवाची पर्वणी – आनंदाला गवसणी , महिला भगिनींसाठी आली श्रावण सरी “

” सुधाकरभाऊ घारे फाउंडेशन , कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांचा पुढाकार..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” श्रावण महिना ” हा महिला भगिनींच्या माहेरवासातील आनंदाचा आणि उत्साहाचा महिना . त्यांच्या आनंदात भर घालण्यासाठी ” श्री सुधाकरभाऊ घारे फाउंडेशन व कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस ” घेऊन आल्या आहेत ” उत्सवाची पर्वणी – आनंदाला गवसणी , महिला भगिनींसाठी आली श्रावण सरी ” या समूह नृत्य कार्यक्रमास भरघोस बक्षिसे व मानाची पैठणी आणि नथ असा सुमधुर कार्यक्रमाचे आयोजन ” समूहनृत्य स्पर्धा २०२५ ” बुधवार दिनांक १३ ऑगस्ट २०२५ दुपारी २ वाजता , रॉयल गार्डन – मुद्रे , कर्जत येथे आयोजित केले आहे.


ही स्पर्धा कर्जत तालुक्यातील महिलांकरिता मर्यादित असून या स्पर्धेमध्ये लोकनृत्य, कोळीनृत्य, लावणीनृत्य, आदिवासी नृत्य इत्यादी समूह नृत्यांचा समावेश असणार आहे . नृत्यासाठी फक्त मराठी गीतांचा समावेश असावा. एका ग्रुपमध्ये कमीत कमी ८ तर जास्तीत जास्त १२ स्पर्धक महिला असाव्यात. प्रत्येक गटाला सादरीकरणासाठी १० मिनिटांचा अवधी दिला जाईल. नृत्यासाठी लागणारे वाद्यवृंद व इतर साहित्य हे स्पर्धकांनी स्वतः आणावेत. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे.


या स्पर्धेत प्रथम बक्षीस – २२,२२२/- रू. , द्वितीय बक्षीस – १५,५५५/- रू. , तृतीय बक्षीस – ११,१११/- रु. , चतुर्थ क्रमांक – ७,७७७/- रु. , उत्तेजनार्थ – ५,५५५/- रू. व मानाची पैठणी आणि नथ तर उपस्थित महिलांना इतर खेळांमधून मिळणार १६ आकर्षक बक्षिसे , व स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेस मिळणार आकर्षक बक्षिस ,असा बहारदार ” श्रावण सरी समूहनृत्य स्पर्धा – २०२५ ” आयोजित केले असून या कार्यक्रमास सर्व महिला भगिनींनी उपस्थित रहावे , असे निमंत्रण ऍड. पूजा सुर्वे – अध्यक्षा, कर्जत खालापूर विधानसभा राष्ट्रवादी महिला काँग्रेस , ऍड. रंजना धुळे , अध्यक्षा, तालुका कर्जत , सौ. मधुरा चंदन – अध्यक्षा, कर्जत शहर, सौ. स्वाती कुमार – अध्यक्षा, माथेरान शहर , सौ. राजश्री कोकाटे – अध्यक्षा, नेरळ शहर, राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांनी केले आहे.


हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ. मनीषा ठोंबरे , सौ. भारती पालकर , सौ. मनिषा पाटील , सौ. मनीषा देशमुख आदी प्रयत्न करत आहेत . तर ” स्वागताला ” कर्जत तालुका महिला अध्यक्षा ” ऍड. रंजना धुळे ” तयार असल्याचे चित्र येथे दिसत आहे .

- Advertisment -

You cannot copy content of this page