if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे
मावळ तालुक्यातील वडेश्वर पठार येथील राहणारे शिक्षक भाऊ आखाडे यांना रात्रीच्या वेळी झोपेत असताना अती विषारी मण्यार जातीच्या सपाचा सर्पदंश झाला पंरतु त्यांना रूग्नालयात उशिरा उपचार मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना मावळ तालुक्यात घडली आहे.
वडेश्वर पठारावरील राहणारे आखाडे हे जिल्हा परिषद शाळा सटवाई वाडी येथे प्राथमिक शाळेशिक्षक होते काल रात्रीच्या सुमारास झोपेत त्यांना सर्पदशं झाला मात्र पठारावर नीट रस्ता नसल्याने त्यांनी आर्धा तास पायी चालत काही अंतर पार केले तसेच नातेवाईकांच्या मदतीने तसभर दुकाची वरुन प्रवास करून त्यांनी कसे बसे कामशेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले मात्र आरोग्य सेविकेने येथे सर्पदंशा वर उपचार होणार नाहीत असे सांगीतल्याने त्यांना तळेगाव येथील जनरल हॉस्पिटल येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले.
परंतु या दरम्यान शरीरात मोठयाप्रमाणात विष पसरले असल्याने वेळेत उपचार न मिळाल्याने उपचारादरम्यान आखाडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेने वडेश्वर गावात पूर्णपणे शोककळा पसरली आहे.